सोनवद धरणाची पाटचारी फुटल्याने वाघोदे परिसरातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी *
डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील =
दिनांक 5 एप्रिल रोजी रात्री वालखेडा व वाघोदे शिवारातील पाटचारी तुटल्याने वाघोदे येथील शेतकरी किशोर भिला पाटील गट नंबर 441 ड़ वालखेड़ा शिवार या शेतात मक्याचे परिपक्व कणसे काढून ढिगारा पडलेला होता यात चारीचे पाणी गेल्याने संपूर्ण नुकसान झालेले आहे
तसेच याच परिसरात बाजरी सह इतर शेती पिकांचे नुकसान झालेले आहे सोनवद धरण आणि पाणी नियोजन व इतर प्रश्न हा कायमचा डोकेदुखी प्रश्न अजूनही राहिलेला आहे या ठिकाणी पूर्णतः नियोजनाचा अभाव असल्याने वरील प्रकार रात्री घडलेला आहेत भूतकाळात यासंदर्भात वेळोवेळी वृत्तपत्रातून लिखाणही आलेले आहे परंतु त्याचा काहीही परिणाम झालेला नाही म्हणजेच या संदर्भात अधिकारी नेमके काय करतात? यांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे? लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे व शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान पण होत आहे
यास जबाबदार कोण? म्हणून प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी व्यथा व्यक्त करताना संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा व नुकसान भरपाई द्या अशी मागणी देखील केलेली आहे संबंधितांवर फौजदारी गुन्हे जर का दाखल झाले नाहीत तर परिसरातील शेतकऱ्यांसोबत जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील उपोषणास बसणार आहेत असा इशारा देखील देण्यात आलेला आहे







