सासूबाईंच्या संसारातील पाटा -वरवंटा सूनबाईच्या संसारातून गायब
त-हाडी (प्रतिनिधी):
गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागामध्ये संसाराचे वैभव मानले जाणारे पाटा-वरवंटा,जाते , उखळ ,मुसळ आदी ग्रहउपयोगी वस्तू काळाच्या ओघात कालबाह्य झाल्या असून सासूबाईंच्या संसारातील पाटा-वरवंटा याची जागा इलेक्ट्रिक मिक्सरने घेतली असल्याने सूनबाईच्या संसारातुन या वस्तू गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागामध्ये पूर्वी दळण दळण्यासाठी घराघरामध्ये जाते असायचे घरातील माता मा माऊल्या भल्या पहाटे उठून जात्यावर ओवी गाऊन दळण दळत असत.रोज सकाळी दळण दळल्यानंतरच घरामध्ये भाकरीसाठी पीठ उपलब्ध होई.तर भाजीसाठी लागणारे तिखट काडंन कुटणे केल्या नंतरच तिखट, मसाला उपलब्ध होत असे यासाठी प्रत्येक घरामध्ये दगडी पाटा-वरवंटा, उखळ तर दळण दळण्यासाठी जाते असायचे लाकडी वस्तूमध्ये कांडन करण्यासाठी मुसळ असायचे त्याच बरोबर घरामध्ये दूध दही मुबलक असायचे यामुळे त्या दह्याचे घुसळण करून ताक करण्यासाठी रवी असायची परंतु आता या वस्तू घरामध्ये दुर्मिळ झाल्या आहेत.
पूर्वी घरामध्ये घराचे वैभव म्हणून सांभाळल्या जाणाऱ्या आता या वस्तू आधुनिक यंत्र सामुग्रीच्या काळात घरामध्ये अडचण करणाऱ्या ठरत आहेत.यामुळे ग्रामीण भागातही शहरी भागाचे अनुकरण करत या वस्तूंना ग्रामीण भागात घराघरातून हद्दपार केले जात आहे.यामुळे जुन्या वयोवृद्ध माणसांना एकेकाळी घरामध्ये संसाराचे वैभव मानले जाणाऱ्या ग्रह उपयोगी वस्तू घरातून गायब झाल्याची खंत व्यक्त करत आहेत.
……..……………
जेवणाची रुची गेली
पूर्वी स्वयंपाक करताना महिला पाटा -वरवंटा उखळ यांच्या साह्याने तिखट मसाल्याचे कांडन कुटणे करून कुटुंबासाठी भाजी करत या भाजी मध्ये मोठी रुची असायची यामुळे घरातील व्यक्ती या भाजी बरोबर भाकरी चुरून मोठ्या चवीने खात असत मात्र आता यंत्र सामुग्रीत कांडन कुटन केलेल्या मसाल्यात आता ही चव दुर्मिळ झाली आहे.आणि आरोग्यास ही यंत्र सामग्रीचे मसाले हानिकारक ठरत आहे.
…………………







