प्रतिनिधी विनायक पावसे
हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्ताने तालुका कृषी अधिकारी कार्यालय आर्णी व एक हात मदतीचा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी माननीय तहसीलदार श्री. भोसले साहेब, तालुका कृषी अधिकारी मा.श्री राठोड , एक हात मदतीचा ग्रुप सर्व सदस्य व कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच वृक्षारोपण करून शेतकरी बांधवांना विविध योजनेची माहिती देण्यात आली. याप्रसंगी ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदविला.