शिरपूर उष्माघातापासून बचावासाठी स्वतःची काळजी घ्या: रावसाहेब चव्हाण(सामाजिक कार्यकर्ते)
त-हाडी प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील शिरपूर व त-हाडी परिसरातील व वरून,भटाणे येथील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेची काळजी घ्यावी अशे आवाहन रावसाहेब चव्हाण(सामाजिक कार्यकर्ते) त-हाडी यांनी केले आहे.उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी व स्वतःचा बचाव करण्यासाठी उपाययोजना करावे
उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, दुरचित्रवाणी, वर्तमानपत्रातील बातमी ची माहिती घ्यावी व यांचा वापर करण्यात यावा. असे जनतेस आवाहन रावसाहेब चव्हाण यांनी केले आहे. तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पितरहावे, हलकी, पातळ व सचिद्र सूती कपडे, पांढरे कपडे वापरावेत. बाहेर जातांना चष्मा, छत्री, टोपी, कातडी बूट, चपल यांचाही वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर डोक्यावर टोपी किंवा पांढरा रुमालाचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, माण चेहरा झाकण्यात यावा, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असेल तर ओ. आर. एस. घरी बनविण्यात आलेली लस्सी. लिबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यातयावा. अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी मुळे उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे आहेत असे ओळखावे आपणास चक्कर येत असल्यास डॉक्टरचा सल्ला घेऊन उपचार करून घ्यावा घर बंद ठेवण्यासाठी पडदे, शटर व कुलरचा वापर करावा पंखे ओले कपडे याचा वापर करावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या
(१)
पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी काम गारांना सूचना करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामे करावे. गरोदर महिला कामगार व आजारी व्यक्ती असेल त्यांची अधिकची काळजी घेण्यात यावी. लहान मुले उन्हामध्ये फिरणार नाहीत अशी त्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे
दुपारी १२ ते ३ या कालावधीत बाहेर ते उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड़ कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. काम आसेल तरच घराबाहेर पडावे विनाकारण घराबाहेर पडूनये तसेच दुपारी १२ ते ३ या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे. जास्त उन्हामध्ये स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व थंड पेय इ. यांचा वापर टाळावा. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिचे असलेले अन्न खाणे टाळावे, शेतातील कामे, बांधकामे हे कामे सकाळी पासून दुपारी १२ वाजेपर्यंत करावे असे आवाहन रावसाहेब चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते) त-हाडी ता.शिरपुर यांनी केले आहे.
( २)