धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या थकीत बोनससाठी तीनशे अडतीस कोटी रू रकमेला मंजुरी
1 जुलै रोजी शासन परिपत्रक निर्गमित
माजी अर्थमंत्री आ .सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
खरीप पणन हंगाम 2020- 21 मधील धानानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या प्रोत्साहनपर राशी अर्थात बोनस साठी तीनशे अडतीस कोटी रू रकमेला मंजुरी देण्यात आली असून दि. 1 जुलै रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वित्तीय सल्लागारांतर्फे याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ . सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत केलेल्या प्रयत्नाना यश प्राप्त झाले आहे.
राज्य सरकारने धान उत्पादक शेतक-यांना देण्यात येणाच्या बोनसची रक्कम प्रदान न केल्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्हयातील धान उत्पादक शेतक-यांवर अन्याय होत आहे. सध्या शेतीची कामे सुरु झाली असुन बी-बीयाणे, खते व इतर शेतीविषयक साधने खरेदी करावयास व शेतीकामास शेतक-यांना पैश्यांची गरज असताना त्यांच्या हक्काचा बोनस शासनाद्वारे देण्यात येत, नसल्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे अशी भूमिका 22 जून रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांची भेट घेत केलेल्या चर्चेदरम्यान मांडली यावेळी आ. मुनगंटीवार म्हणाले ,
महाराष्ट्र शासनाद्वारे धान उत्पादक शेतक-यांना एप्रिल महिन्यामध्येच त्यांच्या हक्काचे बोनस मिळणे अपेक्षित होते. पण जुन महिन्याचा मध्य उलटून गेला असताना अद्याप बोनस मिळालेले नाही. त्याच प्रमाणे शासनाद्वारे खरेदी करण्यात आलेल्या धानाचे पैसे सुद्धा ब-याच शेतक-यांना मिळालेले नाही. शासनाद्वारे बिजाई पुरवठा करण्यात येतो. तो देखील अनेक शेतक-यांना मिळालेला नाही आहे. त्यामुळे गरिब शेतक-यांना खाजगी दुकानातुन महागात बिजाई खरेदी करावी लागत आहे. यामुळे त्यांचे आर्थिक शोषण होत आहे. या बोनसपोटी शेतकऱ्यांचे 800 कोटी रू शासनाकडे थकीत आहे ,याकडे त्यांनी छगन भुजबळ यांचे लक्ष वेधले.
सदर प्रकरणी त्वरित सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन ना. भुजबळ यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले होते. त्या नुसार दि. 1 जुलै रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वित्तीय सल्लागार यांनी शासन परिपत्रक निर्गमित करून तीनशे अडतीस कोटी रू रकमेला मंजुरी दिली आहे. प्रोत्साहनपर राशीची उर्वरीत रक्कम सुध्दा शासनाने लवकरात लवकर प्रदान करण्याची मागणी करत अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. भुजबळ यांचे आ. मुनगंटीवार यांनी आभार व्यक्त केले आहे.