त-हाडी येथे सती वानुमातेची यात्रा
यात्रा विशेष
ललिता खोंडे
त-हाडी प्रतिनिधी
त-हाडी ता, शिरपूर, शिरपूर तालुक्यातील पश्चिमेला तापी नदी जवळील पांढरे सोने पिकविणाऱ्या त-हाडी गावाची चैत्र शुद्ध पंचमी उद्या दि,21 ,व 22 एप्रिल रोजी आदिशक्ती सत्वशिल आई सती वानुमातेची यात्रा होणार आहे चैत्र शुद्ध पंचमीला वानुमातेची यात्रा उत्सहात भरते यात्रेला परिसरातुन वरुळ ,भटाणे,हिगंणी ,ममाणे,अभानपुर,लोढरे,जवखेडा, भामपुर,त-हाडी,तोरखेडा,कुभारे, या परिसरातून भाविक हजेरी लावतात आधुनिक युगातही वानूमातेवरची श्रद्धा ग्रामस्थांमध्ये कमी झालेली नाही

गावातील लहानांपासुन ते मोठ्या पर्यंत सर्व च यात्रेची आतुरतेने वाट पहातात सती वानूमातेबाबत सांगितले जाते की सती वानूमातेचा जन्म साधारणता 1850 मध्ये झाला असावा तर मुत्यु 1876साली झाला म्हणजे त्यांना अल्पायुष्य लाभले होते अल्पायुष्यात त्याचा दैवी चमत्कार होवुन त्या महानदैवी म्हणून रुपाला जन्माला आल्या होत्या त्यांच्या वडिलांचे नाव भिका पाटील होते तर आईचे नाव झालाबाई होते
सती वानुमातेचा विवाह डोंगरगाव तालुका शिदखेडा येथेल शेतकरी कुटुंबात झाला होता लहानपणापासुन त्यांच्या अगांत जलपऱ्या आसरा होत्या लहानपणी लग्न झाल्याने त्या सासरी जात होत्या तर त्यांच्या चमत्कारामुळे तेथील लोक व घरची माणसे वानूमातेला भाग्यशाली मानत होते त्या जेव्हा चालत होत्या तेव्हा त्यांच्या पायातून गुलाल ,कुकू निघत होते असे रोजचे चमत्कार पाहून त्यांनी वानूमातेला माहेरी म्हणजे त-हाडी येथे पोहचविण्यासाठी ठरवले त्यांच्या अंगातील जलपऱ्या असरा त्यांनी रात्री त-हाडी येथून जवळ असलेल्या तापी नदीवर स्तानानासाठी नेत होत्या सकाळी त्याचें कपडे केस ओले असायचे हे पाहून त्यांच्या आई,वडिलांना आश्चर्य वाटत होते व दूःखही होत असते की वानूमाता एवड्य रात्री आघोंळीला कुठे जाते किंवा कपडे ओले कसे होतात

याबद्दल ते चिताग्रक्त्त असायचे वानूमातेविषयी त्यांना काळजी वाटायची एके दिवशी रात्री सर्व दरवाजे खिडक्या झरांखे व स्तन गुहातुन पाणी बाहेर जाण्याचा पाईप सर्व बंद करून घेतले व स्वतः भीका पाटील आणि त्याचे नोकर रात्रभर बाहेर वानुमातेवर पहारा देत बसले तरीही वानूमातेला जलपऱ्या पहाटे स्तानाला घेऊन गेल्या तेव्हा त्यांच्या आई झलाबाई उठून वानूमातेला पहायला गेल्या पण तेथे त्यांना वानूमाता झोपलेल्या आढळल्या नाही हे ऐकून ते कदील घेऊन सर्वत्र वानु मातेचा शोध घेवू लागले त्यावेळी गावात विज नव्हती भिका पाटील वानूमातेला पाहाण्यासाठी नदी वर जात असताना तेव्हा जलपऱ्या या वानूमातेला घरी सोडण्यासाठी येत होत्या मात्र त्यांनी वानुमायेच्य वडीलाना रस्तायात पहिले व रागावल्या त्या संतप्त झल्या की आमच्यावर तुमचा विश्चास नाही रोज आम्ही सकाळपर्यत घरी सोडतो तरी आज तुम्ही इतर माणसांसोबत पहायला आले ते पहुन देवीनि सतीवानचमातेला घरी न आणता परत नदीवर घेवुन नदीत बुडवून दिले तापी नदीला पुराची भीती असल्याने वानुमातेचे प्रेत कोणीही वर काढायला तयार नव्हते
तेव्हा गावातील आदिवासी लोकांनी तिन दिवसानंतर वानूमातेला बाहेर काढले त्यावेळी वानुमातेचे प्रेत फुगलेले नव्हते व त्याचा वासहि येत नव्हता नदी बुडवूहि वानुमातेचे प्रेत जसेंच्या तसे चागल्या स्वरूपात बाहेर काढण्यात आले त्यानंतर एका व्यक्तीच्या स्वप्ननात येवून मातेचे मदिर बाधावे अशी इच्छा वडिलाकडे केली त्यानूसार त्यांनी वानुमातेचे मदिर बांधून दिली त्यात वानुमातेची मुर्ती बसविण्यात आली वानुमाता पाण्यात बुडून गेल्या असल्या कारणांमुळे त्या मगर या वाहनावर बसल्या आहेत त्याचें दोन्ही हात श्नीफळ घेऊन जोडलेले आहेत त्यांनी हिरवी साडी हिरवा चुडा व तशीच ओढणी पांघरलेली आहे हि मूती अतिशय सुंदर आहे येथे चैत्र शुद्ध पंचमीला वानुमातेची यात्रा उत्सव हात भरत आहे वानूमातेला केलेले नवस हे आजही पुर्ण होत असल्याने गावातील तसेच परिसरातील लोक नवस करित असतात वानूमातेला पशु हत्या चालत नाही फक्त श्रीफळ असल्या प्रकारचे नवस असतात वानुमातेचा यात्रोत्सव हा दोन दिवस साजरा केला जातो तसेच त्यांच्या सासरी डोगंरगाव तालुका शिदखेडा येथे मातेची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते तेथे हि भावनिकाची गर्दी असते यावेळी गावातील नागरिक यात्रेच्या दिवशी तगतराव रथाची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते व शेवटी मातेच्या मदिराला पाच फेऱ्या प्रदक्षिणा घालून थाबवतात गावात दोन दिवसांपर्यत रात्री तमाशा कार्यक्रम आयोजित केला असतो
वानुमाता मंदिराला सतीवानु असे नाव देण्यात आले आहे सती सत्वशिर श्रद्धाळु व नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षी हि दि 21,व 22एप्रिल रोजी वानुमातेची यात्रा येथे भरते त्यासाठी तयारी केली आहे यत्रेनिमित धुळे व अमळनेर येथील तमाशागिराचा या वर्षी दि 21 एप्रिल रतन भाऊ नगरदेवळेकर,रोजी २२ एप्रिल राजेश व गणेश सगवीकर याचा तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यत्रेत व्यवसाययिकानि दुकान लावावी असे आवाहन सती वानु माता यात्रा उत्सव समिती त-हाडी, पुजारी संतोष भामरे व सर्व ग्रामस्थ यांनी केले आहे







