• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

विरोधकांनी बालिशपणा सोडावा… सभासदांच्या आशिर्वाने आमचीच सत्ता येणार- विरोधकांना जशाचं तसं उत्तर देणार – हैबतराव पावणे

माणगंगा by माणगंगा
April 21, 2022
in सांगली
0
विरोधकांनी बालिशपणा सोडावा… सभासदांच्या आशिर्वाने आमचीच सत्ता येणार- विरोधकांना जशाचं तसं उत्तर देणार – हैबतराव पावणे
  विरोधकांनी बालिशपणा सोडावा... सभासदांच्या आशिर्वाने आमचीच सत्ता येणार- 

विरोधकांना जशाचं तसं उत्तर देणार – हैबतराव पावणे

आटपाडी प्रतिनिधी

सभासदांच्या आशीर्वादाने प्राथमिक शिक्षक बँकेत आमची सत्ता येणार असे आदर्श शिक्षक हैबतराव पावणे म्हणाले, पुढे बोलताना म्हणाले सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या कारभारावर बोलताना विरोधकांनी इतिहास अभ्यासून बोलावे. कारण आपल्या नेत्यांनी बँकेच्या कारभारात केलेली कामगिरी आपणा सर्वांना ज्ञात आहे. एकेकाळी २१ टक्के व्याज दराने सभासदांच्या व्याज वसुली बँकेच्या माध्यमातून घातली होती.

त्यावेळी पठाणी व्याजदराने लूट करण्यात आली, हा इतिहास आहे व ही गोष्ट आपण प्रथम लक्षात घ्यावी.

आपले बालिश वक्तव्य बंद करावे असा इशारा प्राथमिक शिक्षक बँकेच्या विरोधकांना जिल्हा आदर्श शिक्षक हैबतराव पावणे यांनी दिला.

     पुरोगामी सेवा मंडळाने अर्थात प्राथमिक शिक्षक समितीने सभासदांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत. त्यापैकी पहिला ऐतिहासिक निर्णय म्हणजे व्याजाचे दर टप्प्याटप्प्याने कमी केलेले आहेत. आज जामीनकी कर्ज नंबर २ चा व्याजाचा दर ९.९० टक्के इतका केलेला आहे. हा व्याजदर इतका कमी करताना सहा ते सात वेळा कमी करावा लागला, याचे श्रेय अभ्यासू चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाला जाते. एवढेच नव्हे तर सर्व सभासदांचे व राज्य नेते विश्वनाथ मिरजकर अण्णांचे स्वप्न म्हणजे व्याजाचा दर भविष्यकाळातही कमी होणार आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. 

तूम्ही सत्तेत असताना कधीही व्याजाचा दर कमी केला नाही, केला असेल तर पुरावा घेऊन समोर यावे. टीका करायचे धंदे बंद न केल्यास सभासद तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.

      भ्रष्ट कारभारावर पांघरूण घालण्याचा विषय सत्ताधारी संचालक मंडळाने ठेवलाच नाही. कारण कायमठेवी सभासदांना परत केलेल्या आहेत. निष्कर्जी सभासदाचा मृत्यू झाला तर तीन लाख रुपये,डीसीपीएस धारकांना पाच लाख रुपये व नियमित सभासदांना २० लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी निर्णय, यासारखे कितीतरी चांगले निर्णय सभासदांच्या कल्याणासाठी घेतलेले आहेत. हे उघड्या डोळ्यांना दिसत नाही का? असा फटकाही पावणे यांनी लगावला.

      निवडणुकीचा विषय सोडून द्या, सत्तेत आल्यापासून आत्तापर्यंतच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने व्याजाचा दर कमी करण्याचा विडा उचललेला आहे.त्याप्रमाणे सुनियोजित कार्यवाही चालू आहे. कोण कोणाला गाजर दाखवत आहे हे सभासद ओळखून आहेत, हेही विरोधकांनी ध्यानी घ्यावे.

      टीका करणाऱ्यांनी आधी आपल्या नेत्याच्या भूतकाळातील कारभार उघडून बघावा, तर आणि तरच सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे. आपण ‘खोटे बोल पण रेटून बोल’ हा उद्योग बंद करावा अन्यथा सुज्ञ सभासदांकडून वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

       पायाखालची वाळू कोणाच्या सरकायला लागली आहे? हे सांगायची आवश्यकता  नाही.कारण आपला सभासद बांधव सुजाण, जागरूक मतदार आहे. त्यामुळे तो सगळे ओळखून आहे. आपल्या टीकेने फायदा होण्याऐवजी तोटा मात्र ठरलेला आहे. आता कोणीही पहिल्यासारखे अज्ञानी  राहिलेले नाही. त्यामुळे टीका करताना अगोदर विचार करावा,

     यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका नेते अधिकराव खांडेकर व विश्वास पुजारी, तालुका अध्यक्ष संजय कबीर, सरचिटणीस नानासाहेब झुरे, माजी तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, माजी विभागीय अध्यक्ष दीपक कुंभार, जिल्हा कोषाध्यक्ष सचिन देठे, जिल्हा सहचिटणीस उन्मेश शेटे, माजी संचालक प्रकाश विभुते व सिद्धार्थ कटरे, शाहू फुले आंबेडकर रुग्णालयाचे संचालक श्रीकांत कुंभार व बाबासाहेब शेख, तालुका प्रसिद्धी प्रमुख भास्करराव डिगोळे, सत्यजित भांबुरे, शिवाजी खताळ, इन्ताब इनामदार, विजय पवार, हरिदास जावीर, सत्यवान माने, अजय राक्षे, सतीश मदने, माजी जिल्हा उपाध्यक्ष धनाजी देठे, किशोर पिसे, भीमराव सावंत, शिराज तांबोळी, अंकुश गेजगे, सचिन सासणे, ज्योतीराम सोळशे, वामन सोळंकी, संतोष पिसे,सचिन त्रिगुणे,सतिश पुसावळे, मुख्याध्यापक रमेश हेगडे, यशवंत मोरे, सर्जेराव पुजारी, सुभाष सुतार,रविंद्र सावंत, बाळासाहेब साळुंखे इत्यादी उपस्थित होते.

      समितीचे सैनिक काही झाले तरी सभासदांच्या हितासाठी व कल्याणासाठी बँकेतील व्याजाचा दर आणखी खाली आणण्यासाठी ‘शेंडी तुटो, नाहीतर पारंबी तुटो’ विजयाचे साक्षीदार व्हायचे असे पक्के ठरलेले आहे. यासाठी सभासदांचे आशीर्वाद, केलेल्या कामातून सदैव आमच्या पाठीशी आहे,यात तिळमात्र शंका नाही.त्यामुळे विरोधक मंडळींनी आपल्या ऐपतीप्रमाणे व अवकातीप्रमाणे टीका करावी, अव्वाचीसव्वा टीका खपवून घेतली जाणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला.

Views: 291
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सदर क्रमांक:-034 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ ग्राहक साक्षरता अभियान

सदर क्रमांक:-034 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ ग्राहक साक्षरता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)