भर उन्हाळ्यात दिवसातुन चार घंट्याच्या भारणीयमनाचा विजग्राहकांना शाँक,एमर्जंशी विज बंद करण्याचे आदेश आल्यास तोही अधिकचा भार
चैत्राच्या रखरखत्या उन्हाने जिव होत आहे लाहीलाही,महावितरणाला त्याचे काहीच देणेघेणे नाही
त-हाडी प्रतिनिधी
गेल्या वर्षी तालुक्यातील सर्व भागात वाजवीपेक्षा अधिक पाऊस पडून देखील तालुक्यातील विज ग्राहकांना दिवसातुन चार घंट्याच्या भारणीयमनाचा सामना करावा लागत आहे यात
नियमित विज बील भरणा करणाऱ्या विज ग्राहकांना देखील या भारणीयमनाने त्रस्त केलेले आहे त्यातच या रखरखत्या उन्हाळ्यातील चैत्र महीन्यातील उष्णतेने ४० अंशसेल्शीयसच्यावर तापमान गेलेले असुन सुर्य कमालीची आग ओकत असतांना अबाल वृध्दांच्या जिवाची या गर्मीने काहीली काहीली होत आहे म्हणुन किमान उन्हाळ्यात तरी फुल टाईम विज पुरवठा करावा अशी मागणी विज ग्राहक करीत आहे.
त्यातच हे भारणीयमनाचे चार तास वगळुन पुन्हा वरुन एमजर्शीचा विज बंद करण्याचा आदेश आल्यास आम्हाला तात्काळ विज बंद करावी लागते मग ही विज सुरु केव्हा करावी याची निश्चितता नसते असे महावितरण सुत्राने सांगितले तर ही एमर्जशीची विज रात्री अपरात्री तासंतासासाठी बंद केल्या जात असल्याने आगोदरच भारणीयमनाने त्रस्त असलेल्या नागरीकांवर या एमर्जशी विज बंदचा भार अधिक होत असल्याने आगोदरच कमालीचा उकाडा आणि त्यातच पंखे,कुलर,एसी बंद असल्याने रात्री बाहेर अंगाणी झोपल्यास विविध प्रकारच्या मच्छरांचा दनका सहन करीत रहीवाशांना रात्रंरात्र जाणुनच काढावी लागत आहे त्यातच या वेगवेगळ्या डासांच्या चाव्यांनी रोगराई पसरण्याची भीती नागरीक व्यक्त करीत आहे.
मागील पंधरवाड्यातील सुरुवातीच्या काही दिवस भारणीयमन करण्यात येत होते मात्र त्यावेळी काही सामाजिक राजकीय संघटना तात्काळ जागृत झाल्या व त्यांनी महावितरणाला निवेदने,अर्ज देवुन यावर बंदी आणली मात्र आता २० एप्रिल पासुन दिवसाच्या दोन सत्रात म्हणजे दुपारी अडीच ते साडेचार वाजे पर्यंत तर सांयकाळी पावने सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत असे महावितरणाकडून दिवसातुन सव्वा चार घंटे भारणीयमन केल्या जात असल्याने विज ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहे.
आधीच भर उन्हाळ्यात चैत्राच्या महीण्याचे अंगाला झोंबणाऱ्या रखरखत्या उन्हाचे दमट वातावरणात कमालीची गर्मी होत असतांना आबाल वृध्दांना उन्हाळ्याची अधिकची तिव्रता जाणवत आहे तसेच मुस्लिम धर्मियांचे पवित्र रमजान महीन्याचे उपवास सुरु असतांना रोजेदारांना विज अवश्यक असुन देखील भारणीयमनाचे अधिकचे संकट ओढावल्याने मोठ्या संकटाचा सामना त्यांना करावा लागत आहे तर उन्हाच्या तिव्रतेमुळे सर्वत्र जलसाठे आटत असुन मुक्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी विद्युतपंप सुरु करुन पाणी पाजावे लागते मात्र त्यावेळी विजच नसते म्हणुन या मुक्याजनावरांना पोहऱ्याने विहीरीतुन पाणी काढुन पाणी पाजण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
भारणीयमन आणि या वैतिरिक्त एमर्जशीच्या विज बंद करण्याच्या आदेशाने बंद होत असलेल्या विजेमुळे नागरीकासह सर्व सजिवांचा जिव घुटमळत आहे. तर त्यामुळे हे भारणीयमनाचे ओढावलेल संकट दुर करुन रोजनिशीची विज पुर्ववत करावी अशी मागणी विज ग्राहक करीत आहे.