तऱ्हाडी येथे खासदार डॉ. हिना ताई गावित यांच्या हस्ते काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन
तऱ्हाडी:- येथील ग्रामपंचायतीला डोंगरी विकास योजनेअंतर्गत नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या निधीतून तऱ्हाडी ग्रुप ग्रामपंचायतीला काँक्रीट रस्त्यासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर करून प्रत्यक्षात यांच्या शुभहस्ते तऱ्हाडी येथे काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी तऱ्हाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव ईशी लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे. मल्हार सेनेचे उपाध्यक्ष सुनील धनगर तंटामुक्तीचे अध्यक्ष तुळशीराम भामरे. माजी सरपंच सुदाम भलकार. भटाणे सरपंच विकास पाटील.आवलमाता संस्थेचे अध्यक्ष प्रविण शिरसाठ व तापी परिसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे पोलीस पाटील प्रताप सिंग गिरासे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी खासदार डॉ हिना ताई गावित यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना गेल्या दोन वर्षांचा खासदार निधी हा कोरोना काळात विविध उपाययोजना साठी वापर केला या वर्षापासून निधी उपलब्ध झाला त्या निधीतून हा दहा लाखांचा निधी मंजूर केला आपल्या गावापासुन या कामाची सुरुवात केली आहे भविष्यात आपल्या गावातील सांडपाणी व्यवस्थापन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या दोन गोष्टी तीस वर्षे पुढे चालतील अशी योजना राबविण्यात येणार आहेत गावासाठी आवश्यक च्या गोष्टी असेल त्या गोष्टींना प्राधान्य देऊन तसा निधी उपलब्ध करण्यात येईल अशी ग्वाही खासदार डॉ हिना ताई गावित यांनी दिली यावेळी माजी उपसरपंच गणेश भामरे. अशोक सोनवणे. शरद सोनवणे. विलास भामरे रावसाहेब कदम. सागर सोनवणे. निवृत्त शाखाधिकारी शालिग्राम भामरे. मुख्याध्यापक एन .एच. कश्यप. ग्रामपंचायत सदस्य मंगलबाई भिल ग्राम विकास अधिकारी अविनाश बैसाने प्रा.डाॅ दिलबर सिंग गिरासे व व नागरीक उपस्थित होते
फोटो -त-हाडी येथे डोंगरी विकास योजनेअंतर्गत, विकास कामांचे काॅक्रिट रस्त्याचे भूमिपूजन फलकाचे अनावर करताना नंदुरबार, लोकसभा खासदार डॉ हिना ताई गावित,शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, प्रथम लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे माजी सरपंच सुदाम भलकार, युवा मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष सुनील धनगर, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भामरे, सुभाष भामरे व ग्रामस्थ,







