पटेल प्राथमिक शाळेत उन्हाळी क्रीडा शिबीर
त-हाडी
शिरपूर शहरातील आर सी पटेल प्राथमिक शाळेत उन्हाळी क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात बालगोपाळ मोठ्या उत्साहात सहभागी झालेले आहेत.सदर क्रीडा शिबिर मोफत घेतले जात आहे.
शिरपूर शहरातील आर सी पटेल प्राथमिक शाळेत इयत्ता बालवाडी ते दुसरीच्या वर्गासाठी शालेय स्तरावर उन्हाळी क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. इयत्ता तिसरी व चौथी साठी संस्था स्तरावर उन्हाळी क्रीडा शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.
सदर क्रीडा शिबिरात सकाळी पावणेआठ ते दहा या वेळेत घेण्यात येत आहे.क्रीडा स्पर्धेत सकाळी पावणे आठ ते पावणे नऊ एक तास राजगोपाल चंदूलाल भंडारी हॉल येथे योगा व प्राणायाम घेतला जातो. त्यानंतर एक तास मनोरंजनात्मक खेळ, चित्रकला, रंगभरण कार्यानुभव असे वेगवेगळे प्रकार घेतले जातात. सदर क्रीडा शिबिरात इयत्ता बालवाडी चे दुसरी पर्यंतच्या जवळपास २६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
सदर क्रीडा शरीरात सकाळी विवेकानंद ठाकरे व उज्वला पाटील हे योग शिक्षक योग व प्राणायाम शिकवतात. तर मनोरंजनात्मक खेळ सुशीला मराठे, गणेश चौधरी, प्रशांत चौधरी, योगेश बागुल, महेंद्र माळी, सुवर्णा सुर्वे, के.डी. राजपूत, योगेश्वरी ढिवरे,अर्चना जोशी,संगीता चव्हाण,शुभांगी बाविस्कर व वैशाली बारी आदी घेत आहेत.







