त-हाडीत कांदा काढणीचे काम अंतिम टप्प्यात : चाळीत कांदा साठवणही वेगात
त-हाडी:- शिरपूर तालुक्यातील त-हाडी परिसरात उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. सुमारे ९० टक्के क्षेत्रावरावरील उन्हाळी कांदा शेतातून काढला गेला असून कांदा चाळीत भरण्याच्या कामाला सुद्धा वेग आला आहे. त-हाडीसह, वरूळ भटाणे, जवखेडा लोढरे त-हाडकसबे ममाणे अभानपुर विखरण ,आदी ठिकाणी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते.या गावातील मजुरांसह नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तसेच गुजरात सीमेवरील आदी गावातूनही आदिवासी बांधव कांदा काढणीतून मजुरीसाठी दाखल झाले आहेत. प्रती एकर सात ते आठ हजार रू. प्रमाणे मजुरांना मोबदला देऊन कांदा काढण्याची कामे शेतकरी करून घेत आहेत. कांदा चाळीत भरण्यासाठी सुद्धा मजूर काम अंगावर घेऊन जास्तीची मजूरी कमवित आहेत.
शिवारात कांदा काढणीमुळे इतर शेती कामांना मजूरांनी पाठ दाखवली आहे. कांदा काढणीची कामे ‘उधडी’ घेतल्यानंतर दुप्पट किंवा तिप्पट मोबदला कमवता येतं गेल्या वर्षभरापासून विविध संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी कांदा पीक जगविले. मात्र सध्या कांद्याला बाजारपेठेत आठशे ते हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. या कवडीमोल भावात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडलेला सापडले आहेत. त्यामुळे कांदा चाळीत साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
कांद्याच्या उत्पादनात १५ ते १७ हजार रुपये एकरी खर्च येतो आणि सध्या कांद्याच्या बाजार भावामुळे बाजार भाव आठशे ते हजार रुपयेच्या दरम्यान असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीवर भर आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येत आहे.
संजय शातिलाल पाटील, शेतकरी त-हाडी







