गिधाडे विद्यालयाची विद्यार्थिनी कोमल पंकज साळुंखे हीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव
तऱ्हाडी:- 26 एप्रिल
सन 2018 ते20 20 या कालावधीतील स्काउट गाइड राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम मा. भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते स्काऊट गाईड पॅव्हेलियन दादर; मुंबई. येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यातून ग्रामीण शिक्षण विकास मंडळ संचालित डी. आर. पाटील माध्यमिक विद्यालय गिधाडे या शाळेतील विद्यार्थिनी कोमल पंकज साळुंखे या गाइडची निवड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झाली होती
या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्काउट गाइड राज्य पुरस्कार प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले यावेळी सुनील केदार( क्रीडा व युवक कल्याण मंत्री ) आदिती
तटकरे ( क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य) ओम प्रकाश बकोरिया( मुख्य आयुक्त महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला तीच्या निवडीबद्दल ग्राम शिक्षण विकास मंडळ अध्यक्ष मनोहर पाटील .उपाध्यक्ष देवीदास पाटील व मुख्याध्यापक अमित बागले स्काऊट शिक्षक योगेश बागुल व गाईड शिक्षिका सीमा पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे
फोटो:-मुबंई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते स्काऊट गाईड पुरस्कार स्वीकारताना कोमल सांळुखे व मान्यवर






