नाभिक समाजाची वधू वर मेळावा संदर्भात बैठक
त-हाडी
शनिवार दिनांक 28/05/2022 रोजी पुण्यातील वाघोली येथे होणाऱ्या वधू-वर पालक परिचय मेळाव्याची मिटिंग गणेशपेठ नाभीक विठ्ठल मंदिर, डुल्या मारुती चौक,लक्ष्मी रोड जुन्या दूध भट्टी जवळ गणेशपेठ पुणे-2 येथे आयोजित केलेल्या मिटिंगमध्ये वधू-वर पालक परिचय मेळाव्याबाबत अतिशय सकारात्मक चर्चा होऊन यावेळी न्यू सलून पार्लर असोसिएशन भारत देश सेल चे वधु-वर सूचक केंद्र चे अध्यक्ष म्हणुन मा.श्री.दत्तात्रय ( मामा ) मोरे साहेब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व हजर सर्व मान्यवरांनी आपापली मते मांडून चर्चेत भाग घेतला,
मेळाव्यासाठी सर्वांनी सहकार्य करुन एकत्र काम करण्यासाठी श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्ट, डुल्या मारुती चौक,लक्ष्मी रोड जुन्या दूध भट्टी जवळ गणेशपेठ पुणे-2 चे अध्यक्ष व पुणे शहर समन्व्यक शिवसेना मा.श्री.गजानन ( भाऊ ) पंडित यांनी 28 मे 2022 रोजी होणाऱ्या वधु-वर मेळाव्याला सहकार्य करण्यासाठी नाभिक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करत प्रत्येकाने आपापल्या ग्रुपवर असणाऱ्या सभासदांना विनंती करावी की प्रत्येकाने आपल्याकडील नाभीक समाजबांधवांच्या प्रत्येक ग्रुपवर हा मेसेज पाठविण्याची विनंती करावी असे मीटिंग मध्ये ठरविण्यात आले
तसेच न्यू सलून पार्लर असोसिएशन भारत देश चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संभाजी ( राजे ) रायकर यांनी सकल नाभिक समाजाच्या हितासाठी न्यू सलून पार्लर असोसिएशन हि सदैव समाजासाठी अहोरात्र कार्य करेन सर्व नाभिक समाज बांधवांनी व भगिनींनी येणाऱ्या 28 मे 2022 रोजी होणाऱ्या मेळाव्यात मोठ्या उत्सुकतेने सहभागी व्हावे व नाभिक समाज हा एकत्र संगनमताने कार्य करत आहे हे सर्वांनी या मेळाव्याच्या माध्यमातून समाज संघटन दाखवून देण्यात यावे हीच सदिच्छा व्यक्त केली*
सदर मीटिंगला न्यू सलून पार्लर असोसिएशन भारत देश चे मार्गदर्शक मा.श्री.बाळासाहेब तावरे,मार्गदर्शक मा.श्री.विलासराव साळुंके, संस्थापक उपाध्यक्ष मा.श्री. किरण ( भाऊ ) काळे, युवक सचिव महा.राज्य चे मा.श्री.मंगेश ( दादा ) काळे, सोशल मीडिया व प्रसिद्धी प्रमुख महा.राज्य चे मा.श्री.दत्तात्रय जी वाघमारे, पुणे जिल्हा सचिव मा.श्री.आप्पासाहेब चित्ते हवेली तालुका अध्यक्ष मा.श्री.अनंत (दादा)सूर्यवंशी, सदस्य मा.श्री.गणेश ( दादा ) शिंदे, सदस्य मा.श्री.बाळासाहेब सांगळे, सदस्य मा.श्री.शिवाजीराव भगत, सदस्य मा.श्री.संतोषजी बिडवे , सदस्य मा.श्री.किशोर जी पवार, सदस्य मा.श्री.विकी सोनवणे, सदस्य मा.श्री.सागर (दादा )मोरे, सदस्य सौ.साधनाताई बिडवे,सदस्य सौ.नंदाताई भगत सभासद प्रत्यक्ष हजर होते