• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

★ बेरोजगारीचे दाहक वास्तव ★

माणगंगा by माणगंगा
May 2, 2022
in महाराष्ट्र
0
★ बेरोजगारीचे दाहक वास्तव ★

★ बेरोजगारीचे दाहक वास्तव ★


*बेरोजगारी हा एक मन अस्वस्थ करणारा विषय आहे .लहान मुले आणि वृद्ध यांना काम नाही ,त्यांची कारणे मान्य आहेत. स्त्रिया आपलं घर परिवार सांभाळतात त्यासाठी आयुष्यभर राबतात .भावी नागरिकांना लहानाचं मोठ करतात ,हेच त्या आपलं काम समजतात ,पण ज्यांच्या हातात काही काम नाही असा तरुण तरुणींचा शिक्षित वर्ग आज फार मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे ,हे सत्य काबुल करावेच लागेल .


*जिथे तिथे हजारो च्या संख्येने तरुण वर्ग विविध परीक्षा देतात .भरती प्रक्रियेतून जातात ,त्यामानाने नोकऱ्या फार कमी आहेत ,त्यातही प्रत्यक्ष नोकरी देतांना दिली-घेतली जाणारी लाच ! किती किडलेली व्यवस्था आहे ही ? गरजवंत अतिशय लाचार असतो पण बाकीच्या बेरोजगारांचे काय ! प्रत्येक गावात असलेली ही बेरोजगारांची फौज, नक्की काय करते याच्याशी कुणालाही कर्तव्य नाही .प्रत्येकाच्या हाताला काम मिळालेच पाहिजे यासाठी प्रशासनातर्फे मोठे मोठे प्रकल्प सुद्धा नाहीत ,जे आहेत त्यातील बरेच केवळ कागदावरच आहेत .


* अफाट लोकसंख्येच्या समस्येमुळेच प्रत्येकाला रोजगार /नोकरी देणे प्रशासनाला अजिबात शक्य नाही .खाजगी उद्योग/व्यवसायात काही अंशी सोय होते पण कमी पगार असून अनिश्चितता असते .आधुनिक यंत्रांमुळे शेतीत बैल आणि मजुरांची संख्या कमी झाली ,पर्यायाने परंपरागत कुशल कारागीर सुद्धा काही प्रमाणात बेरोजगार झाले .कामाच्या आशेने शहरात आलेल्या मजुरांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली .प्रत्येक शहरातील बेरोजगारांची संख्या कित्येक पटीने वाढली कधीमधी मिळणाऱ्या कामापेक्षा रोजची जीवनशैली जास्त खर्चिक ठरते आहे .


* आत्यंतिक स्पर्धा ,चढाओढ ,असह्य भाव वाढीने व्यवसाय उद्योग व्याव्स्थापनांचे आर्थिक नियोजन पार कोलमडले .अनेक ठिकाणी नाईलाजाने सक्तीची कामगार कपात लादली गेली .सुरक्षिततेला तडा गेला .कुटुंबाच्या काळजीने मन सैर भैर होऊन रोजगाराच्या शोधात केवळ वणवण सुरु असलेली दिसते .रिकामे हात आणि उद्याची काळजी माणसाला योग्य अयोग्य ,सत्य असत्य ,नीती अनीती ही सतवचने विसरावयास भाग पडतात .जगण्यासाठी कित्येकवेळा नाईलाजाने शोर्टकटची निवड केली जाते .दुबळे मन असलेला आत्महत्येची वाट पकडतो तर कुणी गुन्हेगारीची साथ धरतो .कुटुंबातील स्त्रिया आणि मुलांना मात्र दुर्दैवाचे दशावताराचे भोग भोगावे लागतात .वर्तमानातील या दाहक वास्तवाला कसं सामोर जायचं बेरोजगारांनी !
* प्रत्येक जिल्ह्यात अगणित लघु उद्योगांचे जाळे उभारले जाऊन प्रत्येकाला रोजगार मिळून सन्मानाच जिण जगता यावे .


* कोरोना साथरोगामुळे सध्या अधुनमधून लॉकडाऊन सुरू आहे सगळ्या व्यावसायिकांना विविध समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळे कामगारांचा रोजीरोटी चा प्रश्न गंभीर आहे.कोट्यावधी लोकांच्या मानसिक संतुलनाची जटील समस्या तिव्र होतांना जाणवते आहे.विकृती आणि संताप या दोन्ही भावना एकत्रित झाल्या तर भविष्यात घडणार्या घटना अत्यंत दुर्दैवी असतील.


सुहास सोहोनी ,
घे उंच भरारी – लेख संग्रह
विवेकानंद कॉलोनी ,अमरावती -४४४६०६ ,

Views: 261
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडी येथे मका प्रात्यक्षिक साठी बियाणे वितरण….. प्रगतशील शेतकरी पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सन्मान

आटपाडी येथे मका प्रात्यक्षिक साठी बियाणे वितरण.....प्रगतशील शेतकरी पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)