आटपाडी येथे मका प्रात्यक्षिक साठी बियाणे वितरण
प्रगतशील शेतकरी पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सन्मान
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथिल व्हणमाने कृषि सेवा केंद्र येथे सिंजेंटा इंडिया लिमिटेड च्या वतीने एरिया मॅनेजर धीरज देशमुख व तालुका वितरक राहुल म्हारणुर तालुका यांचे उपस्थितीत तालुक्यातील प्रयोगशील 25 शेतकऱ्यांना सिंजेंटा कंपनीचे NK6540, NK7328 या नवीन अधिक उत्पादन देणाऱ्या मका वाणाचे वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमात कृषि सहाय्यक रविंद्र घुटूकडे यांनी मका पीक पेरणी अंतर ६०×२० से.मी.,एकरी १०किलो झिंक सल्फेट,योग्य खत व्यवस्थापन ,पेरणी नंतर ३० व ४५दिवसांनी नॅनो युरिया फवारणी .अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणासाठी ५% निंबोळी अर्काचा वापर ई.माहिती शेतकऱ्यांना दिली.
या कार्यक्रमास प्रगतिशील.शेतकरी सदाशिव पुकळे, कृषि सहाय्यक संजय काळेल,विजय रणदिवे,गणेश जाधव व शेतकरी बंधू उपस्थित होते.आभार आकाश व्हणमाने यांनी आभार मानले.







