श्रीरामजी अर्बन निधी बँकेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ATM सेवेचा शुभारंभ
आयकर सहआयुक्त दिनेश व्हनमाने (IRS) यांच्या यांच्या हस्ते संपन्न
ढालगाव :- येथे सुरू करण्यात आलेल्या श्रीरामजी अर्बन निधी बँकेच्या वतीने आज मिनी एटीएम सुविधा सुरू करण्यात आली. सहाय्यक आयकर आयुक्त दिनेश व्हनमाने (IRS) यांच्या शुभ हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
नवी संकल्पना... नवी दिशा... या ध्येयाने ढालगाव आणि पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक बँकिंग सुविधा मिळण्यासाठी *श्रीराम ग्रुपच्या* पुढाकाराने नुकतीच ढालगाव येथे श्रीरामजी अर्बन निधी बँक सुरू करण्यात आली. अगदी अल्पावधीतच या बँकेने लोकाभिमुख कार्याची चुणूक दाखवत महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कारावर आपले नाव कोरले. यातूनाच प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असल्याने बँकेचे कार्य आणखी गतीमान आणि आधुनिक सुविधांनी युक्त होऊ लागले आहे. श्रीरामजी अर्बन निधी बँक नवी संकल्पना... नवी वाटचाल करू पाहत आहे.
त्यातीलच एक भाग म्हणून आज दिनांक ५/५/२०२० रोजी मिनी एटीएम सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. स्पर्धेच्या युगात बँकिग क्षेत्रात लोकाभिमुख आणि गतिमान सुविधा ही काळाची गरज बनली आहे. याचा विचार करूनच श्रीरामजी अर्बन निधी बँक नवी संकल्पना... नवी वाटचाल करू पाहत आहे.
कडक उन्हाळा पाहता बालकांचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपत या सोहळ्या प्रसंगी आरेवाडी येथे गावाबाहेर राहत असलेल्या कडकलक्ष्मीवाले या भटक्या जमाती मधील बालकांना चप्पल वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्रीराम ग्रुपचे सर्वेसर्वा अनिल कोळेकर, विठ्ठल रूपनर आदी मान्यवरांसह श्रीरामजी अर्बन निधी बँकेचे पदाधिकारी, कर्मचारी, ठेवीदार, हितचिंतक व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







