वडिलांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त (वर्षश्राद्ध) निमित्त मुलाकडून 500 पेक्षा जास्त “सार्थ ज्ञानेश्वरी”या ग्रंथाचे मोफत वाटप
ढवळी तालुका तासगाव येथील कै.नारायण तायाप्पा घोरपडे यांच्या कुटुंबाच्या या अनोख्या उपक्रमाबाबत सर्वत्र कौतुक
ढवळी तालुका तासगाव येथील आमचे मित्र राजू घोरपडे मिस्त्री यांचे चुलते कै.नारायण तायाप्पा घोरपडे यांचा काल १२ मे २०२२ रोजी दुसरा स्मृतीदिन होता. या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त घोरपडे कुटुंबाने एक अनोखा उपक्रम राबवला गेला.कै.नारायण तातोबा घोरपडे,त्यांची पत्नी सुमन सह तीन मुले नितीन,सचिन,धनाजी अशी सर्वजण भक्ती संप्रदयातील असलेने वडिलांच्या दुसऱ्या
स्मृतिदिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व पाहुणे मंडळींना, गावातील भजनी मंडळींना, पारायण मंडळांना व जिज्ञासू वाचकांना “सार्थ ज्ञानेश्वरी” हा मौलिक ग्रंथ मोफत वाटप केला गेला. सुमारे 500 पेक्षा जास्त ग्रंथाच्या प्रती मोफत वाटल्या.ज्ञानेश्वरी हा ग्रंथ खूप मौलिक असलेने नव्या पिढीने तो वाचला पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रातील संतांची कामगिरी समजून घेतली पाहिजे या उदात्त हेतूने या ग्रंथाचे वाटप करणेत आले ची माहिती नितीन घोरपडे व राजू घोरपडे यांनी दिली.ग्रंथ वाटप करताना सुद्धा भगव्या वेस्ट नात ग्रंथ गुडाळून देण्यात आला. कै.नारायण तायाप्पा घोरपडे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आमची भावपूर्ण श्रद्धांजली व कुटुंबाच्या या अनोख्या कार्यास सलाम🙏🙏🙏🙏
मारुती शिरतोडे वाझर*







