मायणीत यशवंत मेडिकल सेंटर तर्फे आरोग्य शिबीर संपन्न
मायणी,
आज कालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सामान्य लोकांना आरोग्याच्या समस्या सतावू लागल्या आहेत नागरिकांना छोट्या मोठ्या समस्या उदभवत असतात यावर योग्य उपचार वेळेत होणे गरजेचे आहे तसेच कोरोना काळानंतर नागरिकांच्यात आरोग्य समस्या बरोबर भीतीचे प्रमाण ही वाढले आहे यावर भागातही वाड्या वस्त्यावरील लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी मायणी येथे यशवंत मेडिकल सेंटर यांच्या कडून आरोग्य शिबीर ठेवण्यात आले होते
यावेळी या शिबिराला मायणी व मायणी परिसरातील नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा फायदा घेतला यावेळी या शिबिरामध्ये २४५ नागरिकांना मोफत उपचार देण्यात आले यामध्ये अस्थीरोग, मूत्रविकार,नेत्ररोग व स्रीरोग यावर योग्य उपचार देण्यात आले या शिबिरामध्ये डॉ, अक्षय बापट, अस्थीरोग तज्ञ डॉ, मेहता किडनी मुतखडा तज्ञ डॉ, शशिकांत दवंडे डोळे तज्ञ , डॉ, ऋषीकेश मेटकरी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ,गणेश पाडळकर यांनी आपले योगदान दिले
तसेच यशवंत मेडिकल सेंटर व यशवंत हॉस्पिटलचे डॉ. एन. टी. श्रीखंडे, डॉ अनिता श्रीखंडे याच्या संयुक्त रित्या हा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राहुल श्रीखंडे, नवाज बागवान, रवी पवार,सुनीता कांबळे, सपना फाळके, गीतांजली पाटील, निलेश देसाई , सागर यांनी आलेल्या रुग्णाची योग्य काळजी घेऊन योग्य उपचार केले







