संदीप दादाराव मानकर (M.A.) शिवसैनिक, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता

सिल्लोड तालुक्यातील अनाड या छोट्याशा खेडेगावांतून अत्यंत दारिद्रयहीन परिस्थितीतून जन्माला आलेले संदीप मानकर यांनी सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेतली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून शासनदरबारी पाठपुरावा करुन त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचे प्रमाणिक काम मानकर हे गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे करीत आहेत. याच माध्यमांतून गोरगरीब जनतेसाठी आपला हक्काचा माणूस म्हणून त्यांनी परिसरात ख्याती मिळविली आहे.

गोरगरीब जनतेच्या मानगुटीवर बसून त्यांना सोयी-सुविधेपासून वंचीत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवून सर्वसामान्य जनतेला योग्य आणि रास्त न्याय देण्याचा त्यांचा कायम संकल्प राहिलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री तथा सिल्लोड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा.श्री.अब्दुल सत्तार साहेब यांनी तालुक्यात केलेली विकासात्मक कामे, त्यांची न थांबता, न डगमगता, व न थकता कामे करण्याची हातोटी व याचबरोबर दलित-बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते मा.श्री.उत्तमरावजी कांबळे यांच्या सामाजिक कार्याला व विचाराला आदर्श मानून व त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून, कायम त्यांची प्रेरणा घेऊन मानकर हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवीत असतात. त्यांच्या या नेतृत्वशैली मुळेच त्यांनी संपूर्ण परिसरात गोरगरीब जनतेचे कैवारी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे.

लहानपणापासनुच अभ्यासात हुशार असणारे आणि आपल्या चातुर्यवान शैलीमुळे त्यांनी अनेकदा प्रस्थापितांना त्यांच्या स्टाईलने धडा शिकवला आहे. व सडेतोडपणे, आणि निडरपणे आपली भूमिका आपल्या पत्रकारितेच्या लेखणीतून मांडणे हा त्यांचा अतिशय निर्णायक आणि महत्वाचा पॉईंट राहिला आहे. अनाड गांवचे भूमिपुत्र तथा जालना लोकसभेचे माजी खासदार मा.श्री.उत्तमसिंहजी पवार, सिल्लोड विधानसभेचे माजी आमदार स्व.किसनराव काळे, दिवंगत भाजपा नेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब, स्व.प्रमोदजी महाजन, हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव कायम त्यांच्यावर राहिला आहे. व ज्येष्ठांच्या आणि शेंद्रा कमंगर येथील मांगवीरबाबाच्या कृपेमुळे संदीप मानकर यांची सामाजिक, राजकीय व पत्रकारितेतील गगनभरारी अधिकच उंचावत आहे.
■ मानकर यांचा बालप्रवास
संदीप मानकर यांचे प्राथमिक शिक्षण अनाड येथील जि.प.प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण अजिंठ्यातील जि.प.माध्यमिक शाळेत, 11/12 वी शिक्षण अजिंठयातील महात्मा फुले महाविद्यालयात, बी.ए. शिक्षण सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात तर एम.ए. चे शिक्षण औरंगाबाद येथील मिलिंद कला महाविद्यालयात झाले. बालवयापासूनच मानकर यांना सामाजिक कार्याची आवड होती. अभ्यासूवृत्ती, गरिबीची जाणीव, अंगी असलेली जिद्द, चिकाटी, व दृढ आत्मविश्वास या सर्वच गोष्टींच्या बळावर शालेयवयात कित्येक स्पर्धेत त्यांनी अव्वल क्रमांक पटकाविला. त्यांचे वडील स्व.दादाराव खंडू मानकर, आई लक्ष्मीबाई मानकर, व थोरले बंधू गजानन मानकर यांनी काबाडकष्ट करुन मानकर यांना शिकविले. या सर्व गोष्टींची जाणीव अगदी सामर्थ्यपणे पेलावत मानकर यांनी कधीच परिवाराला डगमगू दिले नाही अथवा त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. मतदारसंघाचा सखोल अभ्यास व तगडा जनसंपर्क यांतून मानकर यांनी लोकांची मने अधिकच जिंकली आहे. जी कुणी नवीन व्यक्ती त्यांच्या संपर्कात येते ती त्यांच्या कामाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही ही त्यांची खास पद्धत आहे.
■ कसा राहिला मानकर यांचा राजकीय प्रवास
वयाच्या 19 व्या वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमांतून धर्मजागरण ची जबाबदारी सांभाळत आहेत. भारतीय जनता पक्षात पक्ष वाढीचे व पक्ष बळकटीचे काम करीत असताना त्यांचे काम पाहून पक्षश्रेष्ठींनी 2016 मध्ये मानकर यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा च्या सिल्लोड तालुका सरचिटणीस या पदांवर नियुक्ती केली. त्यांनंतर त्यांनी पक्षवाढीचे काम अविरतपणे चालू ठेवले व तरुणांना पक्षात जोडण्याचे काम त्यांनी मोठ्या प्रमाणात चालू केले. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन 2020 मध्ये त्यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी मानकर यांची संभाजीनगर जिल्हा संघटक सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. याच दरम्यान त्यांचा सर्वांत मोठा राजकीय टर्निंग पॉईंट ठरलेली एक गोष्ट ती म्हणजे अनाड गावांतील ग्रामपंचायत निवडणूक…. बिनविरोध निवडणूकीच्या नावाखाली गांवाचा विकास थांबल्याने मानकर यांनी तरुणांना एकत्र करुन बिनविरोध आणि निवडणूक यांतील फरक समजावून त्यांना निवडणूकीचे महत्त्व समजावून सांगितले व तब्बल 25 वर्षानंतर प्रथमच मानकर यांनी अनाड गांवाला निवडणुकीकडे वळविले व अगोदर सामाजिक कार्याच्या माध्यमांतून जनतेची केलेली कामे याची जाणीव ठेवून लोकांनी आपला हक्काचा माणूस समजून व योग्य उमेदवार समजून त्यांच्या पदरात आपली मते टाकली व प्रथमच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत मानकर यांनी आपला विजय संपादन केला व मग तिथून झाली खऱ्या अर्थाने विकासकामांची सुरुवात.
■ 30 वर्षानंतर बरडवस्तीला प्रकाशमय करण्याचा मुद्दा ठरला सर्वांत महत्वाकांक्षी
अनाड गावांतीलच एका भागांत अतिक्रमणीत असलेली बरडवस्ती ही गेल्या 30 वर्षांपासून अंधारलेली होती. ना वीज, ना पाणी, ना रेशन, ना हक्काची जागा, ना कुठली सोयी-सुविधा.. फक्त दोन वेळचा भाकरीचा प्रश्न घेऊन अशा दारिद्र्यहीन अवस्थेत 20 कुटुंबे आपल्या परिवारासहित या वस्तीवर राहायची यांना निवडणूकीचा अधिकार होता मात्र आपल्या सोयी-सुविधा मिळवाव्यात हा अधिकार त्यांना मिळाला नव्हता. पाहुणा आला तरी केवळ अंधार असल्याने मुक्कामी राहत नसे, सर्पदंश होऊन 2 नागरीक दगावले, अंधार कायम पाचवीला पुंजलेला, महागड्या जमान्यात अजूनही गोडतेलाचे जळते दिवे ! म्हणजे एकीकडे इंडिया डिजीटल होण्याचे स्वप्न पाहणारी मंडळी तर दुसरीकडे बरड वस्तीवर वीज, टेलिव्हिजन, व मोबाईल या गोष्टींपासून कोसो दूर असलेली मंडळी.. हे सर्व वस्तीवरील नागरिक व महिला मिळून गेल्या 30 वर्षांपासून वस्ती प्रकाशमय होण्याची स्वप्ने पाहत होती. याच दरम्यान मानकर यांनी आपल्या निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमांतून या बरडवस्तीची दयनीय अवस्था सर्व प्रसारमाध्यमापर्यंत पोहोचविली व महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री मा.डॉ.नितीन राऊत, सिल्लोड-सोयगांव विधानसभेचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार, औरंगाबाद जिल्हाधिकारी मा.सुनील चव्हाण, व महावितरण विभाग यांनी या परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन केवळ 10 दिवसांच्या कालावधीत या वस्तीवर 63 के.व्ही.स्वतंत्र डी.पी. व 26 विजेचे खांब उभारुन या वस्तीला 20 जून 2021 रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे हस्ते उदघाटन करुन प्रकाशमय केले. व राज्यमंत्री सत्तार यांनी 20 कुटुंबांना रेशन कार्ड वितरीत करुन त्या कुटुंबांची ग्रामपंचायत ला नोंद घेऊन त्यांना घरकुल योजनेत प्राधान्याने समाविष्ट केले जाईल असा शब्द देखील दिला व सोबतच वस्तीला मनरेगा मार्फत स्वतंत्र विहीर मंजूर केली. ही वेळ म्हणजे बरडवस्तीवर ठिकठिकाणी रांगोळीची आरास व फटाक्यांची आतषबाजी करीत जणूकाही एकप्रकारे दिवाळीच साजरी केली! कारण आपल्या घरात 30 वर्षात प्रथमच विजेचा प्रकाश या वस्तीवरील नागरिकांनी बघितला होता.
मानकर यांच्या याच निस्वार्थी पाठपुराव्यातून बरडवस्तीला मिळालेल्या न्यायामुळे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना मानकर यांचा राजकीय प्रवास साजेसा वाटला व तदनंतर 30 जुन रोजी सत्तार यांनी संदीप मानकर व ग्रामपंचायत सदस्या सौ.मनिषा संदीप मानकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करुन घेतला व त्यानंतर केवळ 5 दिवसांतच अनाड गांवातील रस्ते विकास कामांसाठी व पथदिव्यांसाठी 15 लाख रुपयांचा भरघोष निधी दिला व भविष्यात मानकर यांच्या पाठपुराव्यामुळे मी अनाड गावाला कधीही निधीची कमतरता पडू देणार नाही असा शब्द देखील राज्यमंत्री सत्तार यांनी अनाड येथील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी गांववासीयांना दिला.
■ मानकर यांचा सामाजिक व दलित चळवळीतील प्रवास
वयाच्या 22 व्या वर्षांपासून मानकर यांनी सामाजिक चळवळीत काम करायला सुरुवात केली. त्यांवेळी प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात त्यांचा जिकरीने सहभाग असायचा व आपल्या जवळ असलेल्या कौशल्यपूर्ण हातोटीमुळे ते तरुणांशी लगेचच एकरुप होत असे. याच दरम्यान संभाजीनगर औरंगाबाद शहरातील क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.उत्तमरावजी कांबळे यांनी 2015 साली मानकर यांची संघटनेच्या युवक आघाडीच्या मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती केली. सदरील नियुक्ती अगदी योग्य पद्धतीने पेलावत त्यांनी दलित-बहुजन चळवळीतील न्याय हक्कांसाठी व त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अनेक लक्षवेधी क्रांतिकारी मोर्चे, सामाजिक मेळावे, धरणे, निदर्शने, आंदोलने करुन दलित आणि बहुजन समाजातील न्याय-हक्कांकडे शासनाचे लक्ष वेधले व त्यांना योग्य न्याय मिळवून दिला. पुढे त्यांच्या याच सडेतोडपणे होणाऱ्या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून कांबळे यांनी 2021 मध्ये संघटनेच्या युवक आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्याचे काम मानकर यांचेकडे सोपविले व आजतागायत त्या पदांवर ते सामर्थ्यपणे काम करीत आहेत.
महाराष्ट्र राज्यांसहित इतर राज्यातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असलेल्या शेंद्रा कमंगर येथील मांगवीरबाबा यात्रेतील अवैध दारु, सट्टा, पत्ते, जुगार, चोरी यांसारख्या घडणाऱ्या बेकायदेशीर प्रकरणांवर आवाज उठवून त्यांनी न्याय दिला. मातंग समाजातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अबकड वर्गवारी करुन स्वतंत्र आरक्षण मिळावे यांसाठी लेखी निवेदने देऊन आंदोलने करुन शासनाचे लक्ष वेधले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला वाढीव निधी मिळावा यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री व तत्कालीन सामाजिक न्याय राज्यमंत्री यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यांवे यांसाठी मंत्रालयापर्यंत त्यांनी लेखी निवेदनाद्वारे आपला आवाज पोहोचविला, क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगातील असलेल्या 68 शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करावी यांसाठी प्राधान्याने पाठपुरावा केला, अनुसूचित जाती जमातीतील महिलांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व अन्यायग्रस्त तसेच पिडीत कुटुंबाला न्याय मिळावा, त्यांचे पुनर्वसन व्हावे व त्यांचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा यांसाठी शासनाकडे मागणी करुन व पत्रकारितेच्या माध्यमांतून आपली भूमिका लेखणीद्वारे मांडून समाजाची जनजागृती करुन त्यांच्यात आत्मविश्वास रुजविण्याचा प्रयत्न केला.
■ अनेक सामाजिक उपक्रमांतून गरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न
◆ 27 ऑगष्ट 2016 मध्ये आपल्या वडिलांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमीत्त अनाड येथील नागरिकांसाठी मानकर यांनी “मोफत नेत्र तपासणी शिबीर घेऊन चष्मे वाटप केले व त्यांना नवीन प्रेरणा दिली.
◆ भाजपा नेते सुरेश पांडुरंग बनकर यांच्या वाढदिवसानिमीत्त अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम राबविला.
◆ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती महोत्सवानिमीत्त शाळेतील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना एक वही व एक पेन भेट देऊन त्यांची शैक्षणिक जनजागृती केली.
◆ अनाड गांवच्या ज्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले आणि जी गरिबी अनुभवली याची जाणीव ठेवून गांवच्या शाळेतील मुलांनी विज्ञानयुगांतून धढे गिरवावीत म्हणून त्यांनी 26 जानेवारी 2019 रोजी जि.प.शाळेला 32 इंच स्मार्ट डिजीटल टी.व्ही.चा संच भेट दिला व तरुणांसाठी एक आदर्श उभा केला.
◆ सन 2020 मध्ये संपूर्ण देशामध्ये कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातले असतांना व गोरगरिबांची भुकेसाठी परवड होत असतांना मानकर यांनी 16 मे 2020 रोजी आपल्या वाढदिवसानिमीत्त कुठलाही अवाढव्य खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करुन गरजू लोकांना अन्नधान्यांची व किराणा सामानांची किट वाटप करुन त्यांचे आशीर्वाद घेतले.
◆ गावांतील महिलांची पाण्यासाठी दूरवर भटकंती होत असताना वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करुन पाणीप्रश्न मिटविण्यासाठी प्रयत्न केले व त्याच बरोबर गावांतील गरजुंना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अपंगांना त्यांचा राखीव निधी तात्काळ मिळावा, दलितांचा राखीव निधी दलित वस्तीतच खर्च व्हावा, निराधार व वयोवृद्ध असलेल्या नागरिकांना व महिलांना पेंशन व मानधन चालू करावे, नाव नोंदणी नसलेल्या तरुणांची व तरुणींची मतदार यादीत नाव नोंदणी करावी, गावांतील शालेय विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे जातींचे प्रमाणपत्र कमी प्रक्रियेत व कमी दिवसांत मिळवुन देण्यासाठी अथक प्रयत्न.
◆ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 99 व्या जयंतीचे औचित्य साधून अजिंठ्यातील ज्या शाळेत त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले त्या जि.प.माध्यमिक शाळेत सामाजिक कार्यक्रम घेऊन त्यांत सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण 21 नागरिकांना व महिलांना त्यांनी “राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्काराने सन्मानित केले व परिसरातील व तालुक्यातील आदर्श पत्रकारांचा पारितोषिक देऊन सन्मान केला. याच कार्यक्रमाला विशेष आकर्षण म्हणून फुगे घ्या फुगे अभिनेते सचिन कुमावत यांना बोलावून त्यांद्वारे प्रेक्षकांची व जनतेची मने जिंकली.
■ आदर्श पत्रकारितेतून असंख्य ऐतिहासिक व सामाजिक गोष्टींना न्याय
◆ सिल्लोड तालुक्यातील अंधारी या गावांतील दलित समाजातील एका महिलेला गावांतीलच एका सवर्ण समाजाच्या नागरिकाने वादविवादातून पेटवून देण्याचा प्रयत्न करुन त्या महिलेला जिवंत जाळले होते. घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान सदरील महिला मृत पावली हा प्रश्न मानकर यांनी विचारात घेऊन औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेऊन तो प्रश्न तारांकित प्रश्न म्हणून लोकसभेच्या सभागृहात मांडायला लावला व त्या परिवाराला सर्व बाजूने न्याय देण्याचा प्रयत्न केला.
◆ जगप्रसिद्ध अजिंठा गांवचे मराठवाडा मुक्तीसाठी अत्यंत मोठे योगदान असून सुद्धा त्याठिकाणी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी शासकीय ध्वजारोहण होत नव्हते. ही बाब शासनाच्या, प्रशासनाच्या व पालकमंत्री यांच्या लक्षात आणून देऊन व वेळप्रसंगी मानकर यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्या विरोधात बातमी लावून अजिंठ्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी 73 वर्षानंतर प्रथमच शासकीय ध्वजारोहण होण्यासाठी पाठपुरावा करुन 17 सप्टेंबर रोजी अजिंठा गावांतील ऐतिहासिक गांधी चौकात प्रथम ध्वजारोहण सुरु केले.
◆ अनाड येथील एका शेतकऱ्याची विहीर शेतातून चोरी गेल्याची बातमी मानकर यांनी लावताच अवघ्या एका तासांत सदरील बातमी राज्यभर प्रचंड व्हायरल झाली होती या बातमीने प्रशासनाची व महसूल विभागाची इतकी दमछाक झाली व तारांबळ उडाली की, अवघ्या एका तासांत महसूल प्रशासनाने शेतकऱ्याच्या सातबारा वर चुकीने झालेल्या विहिरीच्या नोंदीची दुरुस्ती केली व गेल्या 3 वर्षांपासून महसूल प्रशासनाच्या खेट्या मारत असलेल्या व न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याला योग्य न्याय दिला.
◆ अजिंठा परिसराबरोबरच तालुक्यातील जंजाळा येथील नामशेष होत असलेली घटोत्कच लेणी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, अजिंठयातील पारोची कबर, निजामकालीन इमारतीत असलेले ग्रामीण रुग्णालय, आमसरी परिसरातील आई-भवानी खोरे, शिवना येथील पुरातन काळातील शिवाई मंदीर संस्थान, यांबरोबरच असंख्य ऐतिहासिक वारसा स्थळांचे प्रलंबित व विकासात्मक प्रश्न वेळोवेळी आपल्या लेखणीतून मांडून त्यांवर शासनाला, प्रशासनाला, पुरातत्व विभागाला, व लोकप्रतिनिधींना दखल घ्यायला भाग पाडण्याचे प्रामाणिक काम मानकर यांनी आपल्या आदर्श पत्रकारितेतून मोठ्या प्रमाणात केले आहे.
◆ अनाड गांवचा अत्यंत बिकट असलेला पाणी प्रश्न सोडवून अजिंठा-अंधारी धरणातून पाईपलाईन मंजूर करुन कायम अनाडवाशीयांची पाण्याची भटकंती थांबावी व नानासाहेब देशमुख कृषीसंजीवनी (पोकरा) योजनेत अनाड गांवाचा समावेश करावा यांसाठी वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करुन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला.
◆ परिसरातील व संपर्कातील जो कुणी आपली समस्या, प्रश्न व संकट घेऊन मानकर यांचे जवळ गेला त्यांची समस्या तात्काळच संबंधित अधिकाऱ्याला फोन करून लगेचच त्याच्यावर योग्य निवारण करणे व दखल घ्यायला लावणे या कौशल्यामुळे मानकर हे प्रत्येकाच्या मनात आपली स्वतंत्र जागा निर्माण करीत असतात. कोरोनाकाळात काही डॉक्टरांनी जास्त प्रमाणात पैसा कमावण्याचा गोरखधंदा चालू केला असता यांत गरीब जनतेची मोठ्या प्रमाणात लूट केली जायची. यांवेळी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी मानकर यांचेकडे आपली समस्या मांडली असता संबंधित डॉक्टरांची समक्ष भेट घेऊन जाब विचारला व रुग्णांची मोठ्या प्रमाणात होणारी लूट थांबवून, व त्यांचे दवाखान्याचे बिल माफ करुन दिलासा दिला व त्या रुग्णांचे समाधान करुन त्यांना सुदृढ करुन सुखरुप घरी पाठवले.
■ संदीप मानकर यांचे वैयक्तिक संघटन कौशल्य पाहून व त्यांच्यात असलेला हजरजबाबी पणा पाहून कित्येक संघटनांनी त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या तगड्या संपर्कातून आपले संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला.
■ मानकर हे सध्या भूषवित असलेली पदे
◆ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धर्मजागरण ची जबाबदारी
◆ क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषदेची युवक आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी
◆ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची औरंगाबाद जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी
◆ किसान करणी सेनेची औरंगाबाद जिल्हा सचिव पदाची जबाबदारी
◆ केशरिया हिंदू वाहिनीची संभाजीनगर जिल्हा संयोजक पदाची जबाबदारी
◆ हिंदू-दलित महासंघाची औरंगाबाद विभागीय समन्वयक पदाची जबाबदारी
◆ अखिल भारतीय जर्नालिस्ट फेडरेशनची औरंगाबाद जिल्हा प्रवक्ता पदाची जबाबदारी
◆ पत्रकार सेवा संघाची औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी
■ कामाच्या व्यस्ततेतही मित्र व समाजसेवा हेच खरे टॉनिक
कितीही धावपळ असली व पाठीमागे कामाचा कितीही मोठा व्याप असला तरी देखील मानकर हे मित्रांसाठी आवर्जून वेळ देतात. मित्रांची मदत व आपले हातून होणारी समाजसेवा हेच खरे टॉनिक आहे कारण, मित्र हेच नेहमी आपल्या अडीअडचणीत धावून येतात व त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास हाच मला कायम नवीन प्रेरणा देत असतो व सोबतच ज्यांच्यासाठी सामाजिक कार्यातून माझी मदत होते त्या सर्व गोरगरीब जनतेचा माझ्या पाठीशी असलेला आशिर्वाद आणि प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकडून गोरगरीब जनतेची मदत होणे यांत मला खूप मोठे समाधान आणि आनंद मिळतो व हेच सामाजिक कार्य अविरतपणे चालण्यासाठी मला सदैव निरोगी ठेवावे हाच आशिर्वाद मी नेहमी मांगवीरबाबा व साई चरणी मागत असतो असे मानकर आवर्जून सांगत असतात.
*- संदीप दादाराव मानकर*
*संपर्क : 9595117878*







