मनासारखी बायको मिळाली नाही, म्हणून तरुणाची आत्महत्या!
कुठे घडला प्रकार ते पहा
औरंगाबाद
मनासारखी बायको मिळाली नसल्याने नाराज असणाऱ्या एका नवविवाहित तरूणाने व्हॉट्सॲपवर ‘आय क्वीट’ असे स्टेट्स ठेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे रविवारी रात्री ही घटना घडली असून अजय समाधान साबळे (वय २५ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे.तो राजनगर येथे आई-वडील, पत्नीसोबत राहत होता.

अजय हा प्लंबरचे काम करीत होता. त्याचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती.रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास तो जेवण करून दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीत गेला. तेथे त्याने व्हॉट्सॲपवर ‘आय क्वीट’ असे स्टेट्स ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केली
काही वेळात त्याचा मित्र त्याचे व्हॉट्सॲपवरील स्टेट्स पाहून त्याला भेटण्यासाठी आला. तो त्याच्या खोलीत गेला, तेव्हा त्याला अजयने गळफास घेतलेला दिसला. घटनेची माहिती तात्काळ मुकुंदवाडी पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन बेशुद्धावस्थेत असलेल्या अजयला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
मिळालेली माहिती वरून अजय लग्नानंतर नाराज होता.तेव्हापासून तो समाजमाध्यमावरील त्याच्या अकाउंटला नेहमी निराशाजनक विचार असलेले स्टेट्स ठेवत होता. त्याच्या मित्रांनी त्याला अनेकदा विचारले, मात्र तो उत्तर देत नव्हता.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या खोलीत एक सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. यात त्याने लिहिले आहे की, मनासारखी बायको मिळाली नाही, तिला साडी नेसता येत नाही, स्वयंपाक येत नाही, एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये जेवायला नेले, तर तेथेही ती जेवणानंतर स्वत:च्या जेवणाची थाळी उचलून दुसरीकडे ठेवते.
या चिठ्ठीतील हस्ताक्षर त्याचेच आहे का? हे तपासणीसाठी पाठविले जाणार आहे.







