आटपाडीत नगरपंचायतची आधी सूचना जारी
अनेक दिवसापासून नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका हा प्रश्न उपस्थित होत होता त्याला आज पूर्णविराम मिळाला मिळाला
आहे आटपाडी ग्रामपंचायतीत असलेले गावचे गट नंबर १ ते ३२८० व ३४०३ ते ४२१८ ,मापटेमळा ग्रामपंचायतीतील असलेले गावाचे गट नं.१ ते ६०४, भिंगेवाडी ग्रामपंचायतीत असलेल्या गावाचे गट नंबर १ ते १५५ हे आटपाडी नगरपंचायतीचे संक्रमणात्मक स्थानिक क्षेत्र आहे.
या संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या पूर्वेच्या हद्दीस बोंबेवाडी, खाणजोडवाडी, यपावाडी गावची हद्द, पश्चिमेस मुढेवाडी, बनपुरी या गावची हद्द व शेंडगेवाडीवस्ती आटपाडी गट नंबर ३२८१ ते ३४०२, दक्षिणेस तडवळे, मासाळवाडी, बनपुरी गावची हद्द व उत्तरेस गळवेवाडी, पिसेवाडी, आवळाई, शेरेवाडी पुजारवाडी(आटपाडी), देशमुखवाडी गावची हद्द असा हद्दीचा तपशील आहे.