पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ पूजा खडसे यांचा अभिमान महाराष्ट्राचा पुरस्काराने सन्मान.
नाशिक येथे राज्य स्तरीय सोहळ्यात सन्मान.
दोंडाईचा (वि.प्र.) कल्याणी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दोंडाईचा येथील पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूजा खडसे यांना अभिमान महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे झालेल्या राज्य स्तरीय सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी महापौर यतीन वाघ, प्रकाश दायमा, नाशिक मनपा शिक्षण अधिकारी सुनिता धनगर, मजदूर संघाचे संयुक्त सचिव जगदीश गोडसे, गरुड झेप संस्थेचे प्रमुख सोनवणे, डॉ.प्रश्नात भुतडा, डॉ.संजय धुर्जड,सौ दिपाली चांडक, कल्याणी बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक डॉ.सौ.सुनिता मोडक आदी उपस्थित होते.
सौ पूजा खडसे यांना मदर तेरेसा युनिव्हर्सिटी दिल्ली यांच्या वतीने डॉक्टरेट पदवी देण्यात आली.दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात ते उपस्थित राहू शकले नसल्याने महात्मा गांधी व्हर्च्यअल युनिव्हर्सिटी चेअरमन डॉ अविनाश साकुंडे यांच्या हस्ते त्यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली. या आधी त्यांना महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते बचत गट रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला शहरातील उद्योजक, डॉक्टर, वकील, राजकीय आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष फासाटे, प्रतिभा चौधरी यांनी केले.हरीषभाई ठक्कर यांनी संगीत कार्यक्रम सादर केला
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या चेअरमन सौ सुनीता ताई मोदक,अध्यक्षा सौ कल्याणी मोडक, जनसंपर्क अधिकारी सौ केतकी चौधरी, श्री नितीन बोर्डीकर यांनी सहकार्य केले.
सौ पूजा खडसे यांचे राज्याचे माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, माजी मंत्री डॉ हेमंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख, प्रदीप वाणी, नानाभाऊ मराठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे,किरण शिंदे, धुळे जिल्हा शहराध्यक्ष रणजित राजे भोसले, धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती, विद्यमान सदस्य किरण पाटील, ललित वारुडे आदींनी अभिनंदन केले.







