• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीत महादेव कोळी जातीचे दाखले मिळण्यासाठी उपोषण

माणगंगा by माणगंगा
May 31, 2022
in सांगली
0
आटपाडीत महादेव कोळी जातीचे दाखले मिळण्यासाठी उपोषण

आटपाडीत महादेव कोळी जातीचे दाखले मिळण्यासाठी उपोषण

आटपाडी


आटपाडी तालुक्यातील हिवतड,राजेवाडी, लिंगीवरे येथील अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना कोळी महादेव या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी व दप्तर दिरंगाईबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करणेबाबतच्या मागणीसाठी विद्यार्थी व पालक उपोषणास बसले आहेत.
निवेदनात म्हटले आहे की,आटपाडी तालुक्यातील हिवतड, राजेवाडी व लिंगीवरे येथील पालक व विद्यार्थी यांनी २३ मार्च,२०२२ रोजी कोळी महादेव या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑफलाईन अर्ज सादर केले होते. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी, विटा यांनी त्यातील सर्व पुरावे व दस्तऐवज पाहून आटपाडीचे तहसीलदार यांना ऑफलाइन पद्धतीने सर्व पुरावे व कागदपत्रे तसेच स्थानिक चौकशी अहवाल पाठवण्यास सांगितलेले होते.


त्याप्रमाणे तहसीलदार यांनी ऑफलाइन पद्धतीने १५ जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर करून घेऊन मंडलाधिकारी खरसुंडी व दिघंची यांना दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी मंडळ अधिकारी यांना अर्जदार यांचा पारंपारिक व्यवसाय व जात, रहिवास संबंधित चौकशीचे आदेश दिले. मंडल अधिकारी व महसूल कर्मचारी हे जाणीवपूर्वक विलंब करत आहेत, त्यामुळे आमच्या संविधानिक, घटनेने दिलेल्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहेत, असे म्हटले आहे.


याप्रकरणी संबंधित मंडल अधिकारी व महसूल अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी या मागणीसाठी आज सकाळपासून तहसिल कार्यालय, आटपाडी येथे त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्राचे १५ प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालय विटा यांच्याकडे पाठवावेत अशी मागणी आटपाडीचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.


या निवेदनावर नंदकुमार बापू कोळी, नितीन प्रकाश पुंड, विजय बापू कोळी, नारायण प्रल्हाद कोळी, हर्षल नितीन पुंड, रघुनाथ बापू कोळी, सागर विजय पुंड यांच्या सह्या आहेत. यांच्यासह मानसिंग सोपान कोळी, चंद्रकांत शामराव कोळी, डॉ.बापूराव किसन पुंड, ईश्वरा महादेव कोळी, किसन बाळकृष्ण कोळी, संतोष बाळकृष्ण कोळी यांनी उपोषणात भाग घेतला आहे.
या उपोषणास सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भारततात्या पाटील, तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे अरुण वाघमारे, रवींद्र लांडगे ,संभाजी देशमुख आदींनी मान्यवरांनी उपोषणास भेट दिली.


तहसीलदार यांनी मागणी केलेले महादेव कोळी जातीचे दाखले मिळणेबाबतच्या प्रकरणाच्या अनुषंगाने गृह चौकशी करून मंडळ अधिकारी दिघंची व खरसुंडी यांच्याकडून आज दिनांक ३० मे रोजी तहसील कार्यालयात प्रकरण सादर केली आहेत. या जातीचे दाखला मागणीबाबतची प्रकरणे अंतिम मान्यतेसाठी उपविभागीय अधिकारी, विटा यांना पुढील दोन दिवसांत सादर करणे दक्षता घेत आहे. त्या अनुषंगाने सुरू केलेले उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आटपाडी तहसिलदार कार्यालयद्वारे उपोषणकर्त्यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
फोटो – जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण

Views: 2,057
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी व्यकत केली आपली व्यथा/तक्रार !!

निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी व्यकत केली आपली व्यथा/तक्रार !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)