• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सांगलीत ‘लाचलुचपत’चा ‘महावितरण’ला पुन्हा ‘शॉक’ 5500 लाच घेताना लाईनमन ‘जाळ्यात’ : राहत्या जागेतील विद्युत पोल काढून देण्यासाठी घेतली ‘लाच’

माणगंगा by माणगंगा
July 5, 2021
in सांगली
0
सांगलीत ‘लाचलुचपत’चा ‘महावितरण’ला पुन्हा ‘शॉक’ 5500 लाच घेताना लाईनमन ‘जाळ्यात’ : राहत्या जागेतील विद्युत पोल काढून देण्यासाठी घेतली ‘लाच’

माणगंगा न्युज

सांगलीत ‘लाचलुचपत’चा ‘महावितरण’ला पुन्हा ‘शॉक’

5500 लाच घेताना लाईनमन ‘जाळ्यात’ : राहत्या जागेतील विद्युत पोल काढून देण्यासाठी घेतली ‘लाच’

  कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली येथील दोन कंत्राटी वायरमनना लाच घेताना जेरबंद केल्याचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा सांगलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरणला जबरदस्त 'शॉक' दिला आहे. सांगलीत तक्रारदार यांच्या राहत्या जागेतील विद्युत पोल काढून देण्यासाठी 5500 लाच घेणाऱ्या मयूर जयवंत साळुंखे या लाईनमनला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. महावितरणमधील सलग दोन 'ट्रॅप'मुळे खळबळ उडाली आहे.

  याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांच्या राहत्या जागेत विद्युत पोल आहे. हा पोल काढण्यात यावा, अशी मागणी तक्रारदार यांनी लाईनमन मयूर साळुंखे यांच्याकडे केली होती. या कामासाठी साळुंखे यांनी 16 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 10 हजार रुपयांची लाच प्रथम स्वीकारली होती. उर्वरित 6 हजार रुपयांची मागणी ते करीत होते.

  याबाबत तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आज 5 जुलै रोजी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आज या विभागाने पडताळणी केली. पडताळणीत साळुंखे यांनी 6 हजार लाचेची मागणी करून 5500 ला सौदा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदाराच्या राहत्या घराजवळ पोल काढण्याचे काम सुरू होते त्याठिकाणी सापळा लावला होता. यावेळी मयूर साळुंखे यांनी तक्रारदार यांच्याकडून 5500 लाचेची रक्कम स्वीकारली. याचवेळी त्याठिकाणी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साळुंखे याच्यावर झडप घातली.

  दरम्यान, आठवडाभरात महावितरणचे 3 लोक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 'जाळ्यात' सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुजय घाडगे, पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले, गुरुदत्त मोरे, धनंजय खाडे, संजय कलकुटगी, अविनाश सागर, प्रितम चौगुले, भास्कर मोरे, रवींद्र धुमाळ, सलीम मकानदार, सीमा माने, राधिका माने, श्रीपती देशपांडे, विना जाधव, चालक बाळासाहेब पवार यांच्या पथकाने केली
Views: 189
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मजूर, हमाल व बूट पॉलिश करणाऱ्या हजारोंना अन्नधान्य किट वाटप (लवकरच स्टीमर मशीन चे वाटप करणार)

मजूर, हमाल व बूट पॉलिश करणाऱ्या हजारोंना अन्नधान्य किट वाटप (लवकरच स्टीमर मशीन चे वाटप करणार)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)