सांगली जिल्हा शिक्षक बँक पंचवार्षिक निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी शिक्षक समितीच्यावतीने प्रचंड उत्साहात सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक पंचवार्षिक निवडणूक सन 2022 ते 27 यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे तालुक्यातून जिल्हा राखीव ओबीसी गटातून शिक्षक बँकेचे चेअरमन यु. टी.जाधव व तालुका सर्वसाधारण गटातून हैबत पावणे व जिल्हा राखीव एस सी गटातून व तालुका सर्वसाधारण गटातून शाम ऐवळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी तालुकाध्यक्ष संजय कबीर ,सरचिटणीस नानासाहेब झुरे ,नेते प्रकाश विभुते , सिद्धार्थ कटरे , धनाजी देठे , सिराज तांबोळी , दिपक कुंभार, प्रवीण बाड ,जयवंत बंडगर, सचिन देठे, बाळासाहेब साळुंखे, श्रीकांतराजे कुंभार ,शिवाजी खताळ , रमेश हेगडे, हरिदास जावीर,सत्यवान माने, विजय पवार ,वामन सोळंकी, सचिन सासणे ,सतीश मदने , इन्ताब इनामदार ,भास्करराव डिगोळे, व पदाधिकारी उपस्थित होते.







