त-हाडी परिसरात चहा महागला…..पाच रुपयाचा चहा दहा रुपयाला झाला-
प्रतिनिधी ! त-हाडी
चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच.पण हाच चहा जर अचानक पाच रुपयांनी महाग झाला तर…!हो हे खरं आहे.एरव्ही पाच रुपयांना मिळणारा चहा आता परिसर दहा रुपयांना मिळायला लागला आहे.महागाईच्या जमान्यात सर्व मूलभूत आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्यामुळे चहाचे भाव वाढविले असल्याचे चहा विक्रेते सांगत आहेत.चहा म्हणजे काम केल्यानंतर आलेला थकवा घालविण्याचे पेय.आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सुरुवातीला आपण चहा पाजून करतोत.घरी आल्यानंतर देखील पाणी देऊन चहा पाजणे हि आपली संस्कृती.वैज्ञानिक दृष्ट्या चहा आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानकारक या विषयी जरी मत भिन्नता असली तरी बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रॅंचायजीने आपले नाव तयार करून ग्राहकांना आकर्षित केले आहे.ग्रामीण भागातील लोकांना पाच रुपयांना चहा पिण्याची सवय असल्यामुळे परिसरातील चहा विक्रेत्यांनी दहा रुपयांना चहा केल्यामुळे हॉटेलकडे जाणारा ओढा कमी झाला हे मात्र नक्की.
चौकट
महागाईमुळे घेतला निर्णय
चहा तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे भाव वाढल्यामुळे चहाची किंमत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.साखर,पत्ती,दूध आणि गॅस तसेच काचेच्या ग्लासच्या किंमती वाढल्यामुळे पाच रुपयांना चहाविक्री करणे परवडत नाही.खूप वर्षांनी भाववाढ केली असून ग्राहकांनी हॉटेल चालकांचा देखील विचार करावा.







