• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

मायणीस वादळी वाऱ्याचा तीव्र तडाखा- अनेक ठिकाणी पत्रे उडाले, विजेच्या तारा तुटण्याच्या व शेतीचे नुकसान झाल्याच्या घटना.

माणगंगा by माणगंगा
June 7, 2022
in सातारा जिल्हा
0
मायणीस वादळी वाऱ्याचा तीव्र तडाखा- अनेक ठिकाणी पत्रे उडाले, विजेच्या तारा तुटण्याच्या व शेतीचे नुकसान झाल्याच्या घटना.

मायणीस वादळी वाऱ्याचा तीव्र तडाखा- अनेक ठिकाणी पत्रे उडाले, विजेच्या तारा तुटण्याच्या व शेतीचे नुकसान झाल्याच्या घटना.

मायणी प्रतिनिधी तानाजी चव्हाण

           गेले दोन तीन दिवस मायणी व परिसरात उखाडयाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते .रविवारी अचानक सायंकाळी चारच्या दरम्यान एकाएकी आभाळात ढग जमा झाले व प्रचंड वारे व विजांच्या कडकडाटासह मायणी व परिसरातील काही गावात मोठ्या पावसास प्रारंभ झाला. जवळपास दोन तास चाललेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मायणी मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेच्या खांबावरील तारा तुटल्या असून त् जवळपास नाही व परिसरात २४ तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे.

विद्युत मंडळामार्फत युद्धपातळीवर विजेच्या दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल अशी माहिती मायणीचे विद्युत सहाय्यक अभियंता विशाल नाटकर यांनी दिली.

रविवार मायणीच्या आठवडी बाजाराचा दिवस. दुपारी साडेचारच्या दरम्यान अचानक मोठ्या प्रमाणात वादळ सुरू झाल्याने बाजारकरूंची फार मोठ्या प्रमाणावर पळापळ झाली.अनेक व्यापाऱ्यांनी उभारलेले प्लास्टिकच्या कागदांचे शेड फाटून उध्वस्त झाले.  बाजार पटांगणावर एका घराची भिंत कोसळून सहाजण जखमी झाले असून त्यातील पाच जणांना पुढील उपचारासाठी बाहेरगावी पाठवले असून एकावर मायणीमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   

   कातरखटाव-मायणी व मायणी-विटा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची पडझड झाल्यामुळे सुमारे दोन तास सदर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.मायणी विटा रस्ता येथील पडलेले मोठे बाभुळझाड येथील राजू पाटोळे,रोहित पाटोळे, संभाजी पाटोळे, विशाल पाटोळे,अमर जाधव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः कटरच्या साह्याने कापून  ते झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली.यावेळी पोलीस कर्मचारी सानप, खाडे व माने यांनीही त्यांना मदत केली.

          त्याचबरोबर अनेक ठिकाणी पत्र्याची तयार केलेली शेड वाऱ्याने उडून गेली होती तर काही घरावरील पत्रे उडून गेले होते.  तसेच एका ठिकाणीऊस पीक पूर्णता भुईसपाट झाले आहे.

मायणीचे सब स्टेशन चा पाठीमागील मुख्य डी.पी.वर झाड कोसळल्याने येथील तारा तुटल्या व फुलेनगर येथील मुख्य लाइन तुटलेली तातडीने दुरुस्त करून मग खंडीत वीजपुरवठा दुरुस्ती करण्यात येणार असून 

प्रामुख्याने जवळपास 20 ते 24 तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शीतपेय विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पाणीपुरवठा करणारे जार व्यावसायिकांना देखील याचा फटका बसला आहे. गेले आठ दिवस मायणीत अनेक कारणामुळे सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना बंद असून त्यातच कालच्या झालेल्या घटनेमुळे भर पडली असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे .

मायणी परिसरातील कानकात्रे गावात देखील वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून तेथेही विजेचे खांब कोसळले असून त्या ठिकाणीदेखील वीजपुरवठा खंडित झाला आहे . अनफळे येथील मेन लाईन चे सहा ते सात पोल पडल्याने तेथील विद्युत पुरवठा उशिरा सुरू होईल. त्याचप्रमाणे शेतीपंपाची लाईन देखील बंद आहे.

मायणीचे गाव कामगार तलाठी खटावकर यांनी तातडीने पंचनामे करण्यास प्रारंभ केला असून श्रीमती संगीता तुपे यांच्या घरांचे पत्रे उडाले आहेत ,दत्ता शंकर मोरे यांचे कच्च्या स्वरुपातील उभे केलेले शेडचे पत्रे उडाले आहेत,दत्तात्रय सोपान कचरे यांचेजनावरांसाठी उभे केलेले पत्र्याचे शेड उडाले आहे, हसन बागवान यांची केळाची जमीनदोस्त झाली आहे, संग्राम माने यांचे जनावरांचे साठी उभे करण्यात आलेले शेड, सर्जेराव देशमुख यांची साठ हेक्टर आर मध्ये असलेली द्राक्षाची बाग जमीनदोस्त झाली असून उर्वरित पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

चौकट :- बाजार मालाची प्रचंड नासधूस

   रविवार मायणी गावचा आठवडी बाजाराचा मुख्य दिवस. नेहमीप्रमाणे बाजार भरलेला असताना अचानक वादळी वारे सोबत पाऊस आल्याने सर्व बाजार व्यापारी,ग्रामस्थांची एकच धांदल उडाली.सोसाट्याच्या वाऱ्याने सर्व व्यापाऱ्यांची प्लास्टिक छते उडाली व भाजीपाल्याचा माल पावसात भिजल्याने व्यापाऱ्यांनी तो माल तसाच सोडून जाणे पसंत केले. यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.

Views: 325
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
नफरवाडी ग्रामस्थ तर्फ हवालदार बापू भगवानराव कवठेकर यांचा नफरवाडी ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार

नफरवाडी ग्रामस्थ तर्फ हवालदार बापू भगवानराव कवठेकर यांचा नफरवाडी ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)