शिरपूर परिसरात पाऊस चांगला पण जून महिना खंड राहणार
पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नका:कृषी सहाय्यक महेंद्र पाटील यांचा सल्ला
शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात शेतकऱ्यांनी जास्त घाई करु नका अशी सल्ला त-हाडी कृषी सहाय्यक महेंद्र पाटील यांनी दिला आहे.यंदा वाऱ्याचा वेग कमी राहिल्याने,जूनमध्ये पावसात खंड राहणार असून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला हवामानतज्ज्ञ यांनी दिला आहे. मात्र, त्यानंतर चांगला पाऊस असून, संपूर्ण मान्सून काळात यंदा पाऊस १०१ टक्के होणार आहे. तसेच दुष्काळी पट्ट्यात चांगला पाऊस होणार, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी मान्सूनच्या दुसन्य अंदाज जाहीर केला त्यात देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई, तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता आहे. त्यानुसार त्यांच्या मॉडेलचा अंदाज जाहीर केला त्यात राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
त्यासाठी त्यांनी राज्यातील ८४ ठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल व किमान तापमान सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग व सूर्यप्रकाशाचा कालावाधी या घटकांचा अभ्यास केला. त्यानुसार राज्यात १०१ टक्के पावसाचा शक्यता त्यांनी वर्तविली आहे. मात्र, पैदा वाऱ्याचा ताशी वेग कमी आढळल्याने जून महिन्यात पावसात खंड पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर आँगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रणाम चांगले राहणार असल्याचेही महेंद्र पाटील (कृषी सहाय्यक)त-हाडी यांनी शेतकऱ्यांना अशा सल्ला दिला आहे







