कळमसरे गावात विकासरत्न सरकार साहेब रावल कृषी महाविद्यालयातील कृषीदुत दाखल…
त-हाडी : शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे दोंडाईचा येथील स्वोधारक विद्यार्थी संस्थेचे विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून शेतकऱ्यांनी शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कार्यक्रमा अंतर्गत विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली. माती व पाणी परीक्षण, किड व रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, जनावरांचे संगोपन आणि शेती विषयक विविध समस्या व त्यावरील उपाय याची माहिती दिली.
कृषीदूतांमध्ये प्रतापसिंग गीरासे, संदीप गीरासे, रचित गीरासे, सुयोग परमार, सौरव पाटील, अमर गीरासे, शिवम राजपूत, गौरव गीरासे, रूपेश पाटील यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच, शुभम मराठे, किशोर माळी, शुभम माळी, राजेन्द्र गिरासे,उपस्थित होते.त्यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. राजपूत, कार्यक्रम समन्वयक प्रा. सुरज चांदुरकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल पाटील, डॉ. कोमल भास्कर यांचे मार्गदर्शन लाभले.







