शेतकऱ्याचा मुलगा सरपंच झाला अन् गावचा कायापालट झाला….
पत्रकार -सदाशिव पुकळे)
सांगली व सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील शेवटचे टोक,२१३२ लोकसंख्या,गावाच्या तिन्ही बाजूनी डोंगर,पश्चिमेस खटाव तर उत्तरेस माण तालुका असून सततचा दुष्काळ,उपजीविकेसाठी नागरिकांचे स्थलांतर,प्रत्येकाला आर्थिक चणचण अशा परिस्थितीत विहीर पाडून गवत उगवणारी शेती बागायत केली.याच शेतामध्ये उत्पन्न घेऊन कुटुंबाची उपजीविका भागविली जाते. तसेच चंद्रकांत पावणे यांनी शेती चा विकास साधत राजकारणामध्ये पाऊल टाकले यशस्वी झाले.

तसेच ग्रामपंचायत सदस्य,२०१२ ला सरपंच पदी निवड,२०१३ ला पुन्हा सदस्य व उपसरपंच पदी निवड तर सन २०१८ मध्ये लोकनियुक्त सरपंच पदी निवड झाली. २००८ पासूनआम्.गोपीचंद पडळकर व जी. प.सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्या मार्गदर्शाखाली आत्तापर्यंत विविध विकास कामाचा डोंगर उभा केला.
या मध्ये शासनाच्या विविध योजना पारदर्शक राबविल्या इंदिरा आवस योजना,प्रधान मंत्री,रमाई,वसंत घरकुल योजनेअंतर्गत 101 घरकुलांचे वाटप, वाडीवस्तीवर पिण्याच्या पाण्याची नवीन नळ पाणी पुरवठा योजना .दुष्काळात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करून पाण्याचे तंतोतंत वाटप करणे,पवनचक्की उभारणीवेळी वंचित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणे,पाणलोट योजनेंतर्गत शेतात पाणी आडण्यासाठी मातीबांध घालणे,व प्रोत्साहन अनुदान मिळवून देणे,आमदार,जि.प.सदस्य,पं,सं सदस्य,यांच्या निधीतून विविध विकास कामांचा डोंगर उभा केला,..

हायमास पोल,डांबरीकरण व सिमेंट रस्ते,आरसिसी व बंदिस्त गटर,रोजगार हमी योजनेंर्गत नाला खोलीकरण फळबाग लागवड व अन्य कामे मार्गस्थ लावली.जानसुविधा मधून स्मशानभूमी दुरुस्ती,सुशोभिकरण करणे,गुळेवाडी,विभूतवाडी येते प्लेव्हिंग ब्लॉक टाकणे,जनावरांना लसीकरण करणे,कृषी विभागातून अनुदान देणे,बियाणाचे वाटप करणे,ग्रामपंचायत नवीन इमारत उभी करणे.शाळा,अंगणवाडी येथे सोलर बसविणे,व सुखसुविधा करणे,वसई येथील डॉ.दुर्गेश जोशी व तेजस मोटे यांच्या माध्यमातून ५ लाखा च्या औषधाचे मोफत वाटप करणे,आजी माजी सौनिक व पत्रकारांना घरपट्टी माफ करणे,मुलींच्या जन्माच्या स्वगतासाठी सुकन्या योजनेंतर्गत पाहिला हप्ता भरणे,जलजीवन योजनेंर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करणे.कोरोनाच्या महामारीत ३४० कुटुंबाना अन्नधान्य वाटप,जिल्हा परिषद शाळेच्या ३ खोल्या मंजूर केल्या.तसेच महिला सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटाची स्थापना करणे.तसेच डॉ.प्रवीण विठ्ठल मोटे यांच्या माध्यमातून आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी मदत व मार्गदर्शन करणे.तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोटे यांच्या माध्यमातून रोजगारस्वयंरोजगार मार्गदर्शन,
तसेच गावचा कायमचा दुष्काळ हटवण्यासाठी टेंभू योजनेचे कायमस्वरूपी पाणी येण्यासाठी लढ्यामध्ये सक्रिय भाग घेतला
अश्या होतकरू, कर्तबवान सरपंच यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा







