त-हाडी येथे विद्यार्थ्यांचे जिल्हा परीषद मराठी शाळा कडुन जोरदार स्वागत
शिरपूर तालुक्यातील त-हाडी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप
प्रतिनिधी त-हाडी
!
उन्हाळी सुट्ट्या संपल्या असून आज पासून शाळेला प्रारंभ झाले आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्यापूर्वीच पाठ्यपुस्तके प्रत्येक तालुक्याच्या शिक्षण विभागाकडे सोपविले आहेत. त्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके दिले जाणार आहेत. शिरपुर तालुक्यातील त-हाडी जिल्हा परिषद मराठी शाळा मधील विद्यार्थ्यांना व शाळेतील विद्यार्थ्यांना आज पुस्तके वाटप झाले आहे. जिल्ह्यातील शाळा १५ जून म्हणजेच आज पासून सुरू होणार असून पाल्यांच्या शाळाप्रवेशासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. सुरुवातीला दिपप्रज्वलन केले,
,शाळेच्या पहिल्या दिवशी लहान मुलांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे अध्यक्ष तंटामुक्त समिती उपअध्यक्ष युवराज भलकार यांच्या असते गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आहे.तसेच शाळेच्या पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तके मोफत वाटप करण्यात आले आसल्यामुळे विद्यार्थी हे मोठ्या संख्येने हजर होते आहेत. शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले . प्रमुख पाहुणे म्हणून सुनील धनगर, युवा मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष, डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर धनगर उपअध्यक्ष जितेंद्र खोंडे अंगणवाडी सेविका मदतनीस शिक्षक शिक्षिका यांच्या मदतीने प्रवेशपञ मुलांचे प्रवेश करून घेण्यात आले आहेत. शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथे पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व पुस्तके आधीच उपलब्ध करून दिले आहेत.
शाळा सुरू होण्याच्या अगोदरच तालुक्यातील सर्व शाळांमध्ये जवळपास सहा दिवसांपूर्वी पुस्तके दाखल झाली आसल्याचे गटशिक्षण अधिकारी साळुंखे यांनी सांगितले
चौकट-
आजपासुन संपुर्ण शाळा सुरू होत आहेत.पहिल्याच दिवशी जि.प.च्या शाळामध्ये प्रवेशपञ साजरा करण्यात आले आहे या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवुन स्वागत केले .व आजच त्यांना मोफत पुस्तके दिली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आंनदाचे वातावरन निर्माण होईल व
जेनेकरून विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
सुनिल धनगर सामाजिक कार्यकर्ते त-हाडी
फोटो
त-हाडी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मुलाचे स्वागत करताना तंटामुक्त समिती उपअध्यक्ष युवराज भलकार सुनील धनगर, युवा मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष, ज्ञानेश्वर धनगर, जितेंद्र खोंडे, डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे अंगणवाडी सेविका मदतनीस व शिक्षक शिक्षिका , ग्रामस्थ पद अधिकारी







