पां.बा.मा. विद्यालयात नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत
शिरपूर: शिरपूर येथील पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कुल व
कनिष्ठ महाविद्यालयात शाळा शुभारंभाच्या निमित्ताने नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वाजत गाजत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य के. पी. कुलकर्णी, उपमुख्याध्यापक श्री. कानडे, पर्यवेक्षक एम. एम. बैसाणे, कार्यालयीन अधिक्षक जे.बी.जाधव, ज्येष्ठ शिक्षक एस.एस. पावरा प्रा. टी. पी. गुजर,प्रा. आर.एन. चौधरी, ए.एच. कोळी, एस. बी. पवार, श्रीमती एस. जी. वाडीले,श्रीमती जे. एन. महाजन ,श्रीमती पी.आर. राजपूत आदी उपस्थित होते.
यावेळी इयत्ता पाचवीच्या नवीन प्रविष्ठ विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच व शालेय गणवेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शालेय शिस्त, अडचणी, अभ्यासाच्या बाबतीत मार्गदर्शन केले. पालकांच्या प्रातिनिधिक स्वरूपात दिपक वाडीले व निलेश वाघ,महिला पालकांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी. ए. मोरे, डी. एच. राजपूत,श्रीमती एन. यु. माळी, ए.के. गुजर, एस.एन. कोळी,श्रीमती पी.के.पाटील आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्र सूत्रसंचालन वाय. एन. गिरासे यांनी केले.







