टेकवाडे प्राथमिक शाळेत नवागतांचे स्वागत
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता बालवाडी ते 4 थी च्या विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी टेकवाडे गावाचे सरपंच श्री सुखदेव वाघ होते तर प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री कृष्णा वाडीले,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री सुभाष महाराज शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री अतुल पाटील पर्यवेक्षक श्री के.बी.चौधरी,प्राध्यापक श्री एस.एम.पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.बी.खोंडे यांनी आपल्या प्रास्तविकातून शाळा प्रवेशोत्सव घेण्यामागचा उद्देश व त्यातून विद्यार्थ्यांना होणारे फायदे उपस्थित पालक व मान्यवरांना समजावून सांगितले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेतील नवागतांचा पुष्पगुच्छ चाॕकलेट देवून स्वागत करण्यात आले.त्यानंतर शासन आदेशानुसार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.
शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना व्हेज पुलाव व जिलेबी असे जेवण देण्यात आले यासाठी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री कृष्णा वाडीले यांचे आर्थिक सहकार्य लाभले.संस्थेचे आश्रय दाते स्व.मुकेशभाई पटेल यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षक श्री संजय पटेल यांनी केले.तर आभार उपशिक्षिका श्रीमती बी.बी.काटोळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालवाडी शिक्षिका एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी श्री बी.एल.पावरा,श्री ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.







