गावास वेठीस धरू नये- पार्ट टाईम कर्मचारी नेमून उध्या पासून आटपाडी ग्रामपंचायत चा पाणी पुरवठा सुरू करू !
सरपंच वृषाली पाटील.
आटपाडी ;
आटपाडी ग्रामपंचायत आकृतिबंध बाहेरील कर्मचारी यांना यापूर्वी दर वर्षाला ५०० रुपये पगारात वाढ ग्रामपंचायत मार्फत होत होती. आपल्या जुलै २०१८ पासून च्या कार्यकाळात फेब्रुवारी २०१९ च्या पगारात ५२५ रुपयांची वाढ केली, त्यानंतर आक्टोंबर २०१९,
जुलै २०२० व आत्ताच
जुन २०२१ प्रत्येकी ५०० रुपये वाढ अशा एकुण ३ वर्षांमध्ये ४ वेळा पगारात वाढ केली, म्हणजेच एका कर्मचारी यांना २०२५ रुपये पगार वाढ करुन देखील कर्मचारी पगार वाढ केलीच नाही असे म्हणुन कर्मचारी यांनी सोमवार दि. ५ जुलै पासुन बेमुदत काम बंद आंदोलन पुकारुन गावचा पाणी पुरवठा सुध्दा बंद केला आहे.
दिवसाला कमीतकमी ५०० ते ७०० रुपये प्रत्येक दिवसाला मिळालेच पाहिजेत अशा अवाजवी मागणी वर कर्मचारी ठाम असल्याने गट विकास अधिकारी साहेब यांच्यासमवेत झालेली कालची चर्चाही निष्फळ ठरली.
ग्रामपंचायत उत्पन्नाच्या ३५% टक्के पेक्षा जास्त खर्च पगारावर व प्रशासन खर्चावर करता येत नाही तरी पण आता सध्या पन्नास टक्के खर्च होत आहे त्यामुळे यापेक्षा जादा पगारवाढ करता येत नाही असे सर्वांनी समजून सांगून देखील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन चालूच ठेवले आहे.
पगार वाढ चुकीचे असेल तर वरिष्ठांकडे दाद मागावी अगर कोर्टात दाद मागावी परंतु त्यासाठी संपूर्ण गावाचा पाणी पुरवठा बंद ठेऊन संपूर्ण गावास वेठीस धरू नये अशी विनंती सरपंच वृषाली पाटील व सर्व ग्रामपंचायत बॉडी ने करून देखील कर्मचारी यांनी नकार दिला.
त्यानंतर आज रोजी आकृतिबंध मधिल ५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत तसेच इतर पार्ट टाईम कामगार नेमणूक करून गावचा पाणीपुरवठा उद्यापासून सुरू होईल तरी कृपया नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती
सरपंच वृषाली पाटील,