• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

समन्यायी पाणी वाटपासाठी संघटीत होण्याची गरज,
पाण्यासाठी भविष्यात संघर्षासाठी तयार राहूया-वैभव नायकवडी

माणगंगा by माणगंगा
June 26, 2022
in सांगली
0
समन्यायी पाणी वाटपासाठी संघटीत होण्याची गरज,पाण्यासाठी भविष्यात संघर्षासाठी तयार राहूया-वैभव नायकवडी

समन्यायी पाणी वाटपासाठी संघटीत होण्याची गरज,
पाण्यासाठी भविष्यात संघर्षासाठी तयार राहूया-वैभव नायकवडी



आटपाडी
दुष्काळी भागातील तालुक्यांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळण्यासाठी व ते पाणी पुरवण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे लागेल.यासाठी भविष्यातील सर्व संघर्षासाठी आपण तयार राहूया,असे आवाहन पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी केले.


आटपाडी येथील जवळे मल्टीपर्पज हॉलमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने कृष्णा खोऱ्यातील १३ दुष्काळग्रस्त तालुक्यातील आणि विशेषतः आटपाडी, सांगोला, मंगळवेढा व जत तालुक्यातील शेतमजूर, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या व जनतेच्या एकोणतीसाव्या पाणी संघर्ष परिषदेत ते बोलत होते.प्रा.डॉ.बाबुराव गुरव अध्यक्षस्थानी होते.


प्रारंभी राजश्री शाहू महाराज,कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे संस्थापक पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी,भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


वैभवकाका नायकवडी पुढे म्हणाले, नागनाथअण्णांनी सुरुवातीला दुष्काळी भागातील लोकांसाठी पाण्याचे स्वप्न बघितले, त्यावेळी हे पाणी दुष्काळी भागात येईल यावर लोकांना विश्वास बसत नव्हता.परंतु आता ते सत्यात उतरले आहे.तेरा दुष्काळी तालुक्‍यातील अपुरी कामे पूर्ण होण्यासाठी पैशाची उपलब्धता होणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी गरजेप्रमाणे धडक मारण्याची तयारी ठेवली पाहिजे.चळवळीच्या रेट्यामुळे काही योजना कार्यान्वित झाल्या, त्या यशस्वीरित्या चालवण्यासाठी, प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
पाणी आलेल्या भागातील लोकांनी चळवळीत सहभाग घेणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील-वरच्या तालुक्यातील लोकांनी गरजेएवढे पाणी घेऊन खालच्या तालुक्याला पाणी दिले पाहिजे, हा समन्वय चळवळीच्या माध्यमातून ठेवायचा आहे. दुष्काळी भागातील तालुक्यांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळण्यासाठी व ते पाणी पुरवण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे लागेल. २९ वर्षांपूर्वी जे स्वप्न होतं, ते आता सत्यात यायला लागलेले आहे.

नवीन पिढीला सामावून घेणे, त्यांच्यापुढे इतिहास मांडणी करणे, इतिहास संग्रहित करणे गरजेचे आहे.विजेच्या प्रश्नाची मांडणी व अभ्यास करणे गरजेचे आहे.फक्त शेतकऱ्यांच्या संघटित ताकदीने केवळ प्रश्न सुटणार नाही, म्हणून आपणाला संघटनेची ताकद वाढवणेे, शेतकरी संघटित ठेवणे आणि दुष्काळी तालुक्याचे प्रश्न सोडवणे हे महत्त्वाचे आहे. यासाठी भविष्यातील सर्व संघर्षासाठी आपण तयार राहूया,असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
समन्यायी पाणी वाटपासाठी संघटन मजबूत करावे लागणार आहे-प्रा.बाबुराव गुरव
प्रा.बाबुराव गुरव अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले,
नागनाथअण्णा व गणपतरावआबा यांच्यामुळे परिसरात पाणी आलेले आहे, पण त्याचे समन्यायी पद्धतीने वाटप झाले नाही,शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचलेले नाही. ते प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात कसे जायचे हा आपला मूळचा प्रश्न आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात माणसी एक हजार घन मीटर पाणी ज्या त्या गावाच्या ताब्यात गेले पाहिजे. पाणी वाटपासाठी सहकारी सोसायट्या स्थापन करून सरसकट कुटुंबांचा पाणी योजनेत समावेश करून घेतला पाहिजे. पाणी सोसायटीच्या ताब्यात त्या गावातील पाणी गेले पाहिजे.शेती असणा-या व नसणाऱ्यांनी आपापल्या वाट्याला किती पाणी येते, त्याचे गावातच नियोजन केले पाहिजे.

पाण्याबाबत अजून आपले हात स्वर्गाला लागले नाहीत.मीटरप्रमाणे मोजून वापरलेल्या पाण्यावर आकारले गेलेल्या वीज बीलपैकी १९ टक्के बील शेतकऱ्यांनी भरायचे आहे, हा प्रश्न सोडवायचा आहे.आत्ता आलेले पाणी फक्त नुसते पाणी आलेले आहे, त्याचे समन्यायी पद्धतीने वाटप झालेले नाही.पाणी आले हे खरे असेल, परंतु
नागनाथअण्णा, गणपतरावआबा, राजर्षी शाहू महाराज यांनी केलेलं कार्य,पाहिलेली स्वप्ने आपण पूर्ण करणार आहात का? ते केले तर हीच खरी कृतज्ञता आहे. आटपाडी तालुक्याला सौर उर्जेवर पाणी देऊ असा ठराव फडणवीस मुख्यमंत्री असताना केलेला होता. त्याचे काम तरी सुरू झाले आहे का? आपणही ते मागत नाही. प्रत्येक तालुक्याला ठरलेले टीएमसी पाणी आलेले नाही. आपण जर मागितले नाही, तर ते येणारही नाही. यासाठी चळवळ जीवंत ठेवावी लागणार आहे. पूर्वी चळवळीचा रस्त्यावर आवाज वाढला की सभागृहात काम होत होते. २५ हजार लोकांनी टेंभू कार्यालयाला घेराव घातला, त्यावेळी आर.आर.आबांनी पंधराशे कोटी रुपये देण्याचे घोषित केले. आता तशी परिस्थिती आहे का?


आपण सूत्र लक्षात ठेवून काम केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जायचं असेल तर आपण सावध राहिले पाहिजे.झालेली कामे व राहिलेली कामे आपणास माहीत पाहिजेत, त्या कामाला रेटा लावला पाहिजे. चळवळ वैज्ञानिक पद्धतीने, सिस्टेमॅटिक पद्धतीने चालवली पाहिजे.समन्यायी पाणी वाटपासाठी संघटन मजबूत करावे लागणार आहे असेही आवाहन त्यांनी केलेे.
नागनाथअण्णांच्या स्मारकासाठी एक एकर जागा देणार- राजेंद्रअण्णा देशमुख
माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले,बदलत्या शैलीनुसार पिकांना पाणी देण्याची पद्धत बदलली आहे,आता पीक पद्धतही बदलत आहे.वीज बील जास्त यायला लागले आहे.गणपतराव आबांनी सरकारकडे मांडलेले पाणी योजनेचे वीज बील १९ टक्के शेतकऱ्यांनी व ८१ टक्के सरकारने भरायचे, याची मुदत संपत आलेले आहे.लहरी सरकार,लहरी निसर्ग यावर आम्ही शेती कशीी करायची अशी स्थिती आहे.पाण्याचे आवर्तन दिले नाही, तर स्कीम कशी बंद करता? या भागातील लोक उपजीविकेसाठी स्थलांतर झाले,तेथून कमावलेला पैसे आणला तर तो शेतीवरच खर्च करायची पद्धत झाली आहे. सरकारने पाण्याचे अगोदर आवर्तन द्यावे व त्यानंतर पाच वर्षानंतर सहाव्या वर्षी वीजेचे बील कशा पद्धतीने घ्यावे,हे आपण आता ठराव करून सांगावे लागेल. यावेळी पाच वर्षे आवर्तन दिल्यानंतर १९:८१ चा नियम सहाव्या वर्षी बदलावा लागेल असा ठराव केला.


ते पुढे म्हणाले,पाणी प्रश्न समूळ सोडवण्यासाठी सरकारमध्ये पूर्वीच्यासारखी गणपतराव आबा व आर.आर.आबांसारखी साखळी भविष्यात निर्माण करावी लागेल.यासाठी तशा पद्धतीचे वातावरण तयार करावे लागेल.
चळवळीबाबत बोलताना ते म्हणाले,विरोधक चांगले नसतील तर लोकशाही टिकणार नाही, यासाठी चळवळीचे माध्यम कायम ठेवणे गरजेचे आहे.नागनाथअण्णांचे स्मारक होण्यासाठी एक एकर जागा देण्यास तयार आहे.
चळवळीवर पीएचडीदेखील करता आले पाहिजे, असे वातावरण आपणास तेथे तयार करायचे आहे. चळवळ बंद पडली तर सामान्य माणसांवर होणारा अन्याय कधीही दूर करता येणार नाही. विरोधासाठी विरोध न करता, आपला प्रश्न सोडवण्यासाठी ही चळवळ उभा करायची आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ कशी निर्माण करता येईल, हे भारत देशातील उदाहरण व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळण्यासाठी भविष्यामध्ये आखणी करावी लागेल.


नागनाथअण्णांची जन्मशताब्दी कृतज्ञता वर्ष म्हणून पुढच्या वर्षी हीच पाणी परिषद सभा भवानी हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या संख्येने घेऊया.चळवळीचा नेटकेपणाने उपयोग करून घेतला तर अनेक प्रश्न सुटतील.पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी चळवळ असणे गरजेचे आहे. चळवळीला चांगल्या पद्धतीने उभारी देऊया, वैभवकाकांच्या समूहाने स्मारकासाठी चांगल्या पद्धतीने विचार करावा,आपला प्रश्न सोडवणारी संस्था म्हणून सर्वसामान्यांच्या मनामधून ही संस्था नावारूपास यावी अशी हुतात्मा समूहाबद्दल त्यांनी शेवटी अपेक्षा व्यक्त केली.


चंद्रकांतदादा देशमुख म्हणाले, पाणी संघर्ष परिषदेमुळे कृष्णेचे पाणी आपल्या तालुक्याला आणू शकलो,आणखी पूर्णपणे देण्यासाठी संघर्ष करावा लागेल.त्याग करून एका पिढीने संघर्ष करून पाणी आणले,दुसऱ्या पिढीने पाणी वाटप कसे करायचे हे ठरवावे लागेल,त्यासाठी सजग रहावे.
त्यांनीही यावेळी ठराव मांडला.


कवठेमहंकाळ तालुक्यातील प्रा.दादासाहेब ढेरे म्हणाले, क्रांतिवीर नागनाथअण्णा यांच्या चळवळीतील प्रमुख योगदानाबद्दल तेरा दुष्काळी तालुक्यातील प्रत्येक घटकापर्यंत त्यांच्या स्मृती चिरंतन टिकाव्यात अशी व्यवस्था व्हावी.


आटपाडीचे माजी सरपंच शिवाजीरावतात्या पाटील म्हणाले,अण्णांनी चळवळ उभी केली आणि पाणी न देणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे राज्य घालविले आहे.
ॲड.सुभाष पाटील म्हणाले,टेंभू योजनेला क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव द्यावे.
प्रा.विश्वंबर बाबर यांनी परिसरातील वंचित गावांना पाणी मिळावे म्हणून ठराव मांडला.


आर.एस.चोपडे म्हणाले,चळवळीची दिशा तरुणांच्या मनामध्ये रुजली पाहिजे.शिक्षण आणि पाणी या दोन गोष्टी माणसाचे जीवन उभे करतात,असे नागनाथअण्णा नेहमी म्‍हणत होते.चळवळीचा पेटवलेला दीप आपणास पुढे न्यायचा आहे.


डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले,परिषदेच्या माध्यमातून पाणी अंतिम टप्प्यापर्यंत आलेले आहे.ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याची गरज आहे.परिषदेच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचे काम तरुणवर्ग करेल.


मंगळवेढा तालुक्यातील प्रा.शिवाजीराव काळुंके म्हणाले, गणपतराव देशमुख आबांनी बाहेर चळवळीच्या माध्यमातून व विधिमंडळाच्या सभागृहात सभागृहाचे नेते म्हणून फार मोठे योगदान दिले आहे.दुष्काळी तालुक्यातील लोकांचे योगदानही मोठे आहे.आता पाणी पाहायला मिळाले आहे, परंतु दुष्काळी भागातील साठवण तलाव भरून कायमस्वरूपी मिळाले पाहिजे.पाण्याची क्षमता वाढली पाहिजे.बंदिस्त पाईपलाईनमधून उरलेले पाणी पुढच्या गावांना मिळाल्यास त्यांच्यातील दुष्काळ हटेल.पाण्यासाठी शेतकरी सदैव जागा राहिला पाहिजे.जुनोनी येथील पाणी योजना आदर्शपणे सुरू झालेली आहे. मंगळवेढा तालुक्‍यातील २४ गावांना २०१४ साली मंजूर झालेली मंगळवेढा उपसा सिंचन योजना निधी उपलब्ध करून कार्यान्वित करावी.


प्रा.दत्ताजीराव जाधव यांनीही ठराव मांडला.प्रा.बाळासाहेब नायकवडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सावंता पुसावळे यांनी आभार मानले.
या परिषदेला तेरा दुष्काळी तालुक्यातील शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी तसेच चळवळीमधील सहभागी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 263
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
महापुरुषांचे आचार विचार अंगीकृत करून सामाजिक कार्य करावे काळाची गरज-डॉ.प्रशांत नारनवरे

महापुरुषांचे आचार विचार अंगीकृत करून सामाजिक कार्य करावे काळाची गरज-डॉ.प्रशांत नारनवरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)