आटपाडीतील ज्वेलर्स फोडून सत्तरा लाख रुपयांच्या सोने ,चांदीवर डल्ला
आटपाडी शहरातील मुख्य पेठेतील ओम गणेश ज्वेलर्स रविवारी रात्री अज्ञात चोरट्याने फोडून सुमारे सतरा लाख रुपयांच्या सोने, चांदीच्या दाहिन्यासह रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे.
याबाबातची फिर्याद ज्वेलर्स मालक शंकर रघुनाथ चव्हाण वय 45 वर्षे रा.य.पा.वाडी यांनी आटपाडी पोलिसात दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की आटपाडी च्या मुख्य बाजार पेठे मध्ये एस टी स्टँड पासून सुरू होणाऱ्या बाजरपेठेत य.पा.वाडीचे शंकर चव्हाण यांचे ओम गणेश ज्वेलर्स चे दुकान आहे.रविवारी आटपाडी शहरातील सर्व ज्वेलर्स यांची साप्ताहिक सुट्टी असते.याच कारणाने ओम गणेश ज्वेलर्स ही रविवारी बंद होते.
दरम्यान रविवारी रात्री व सोमवारच्या पाहटे साधारणता तीन वाजण्याच्या सुमारास ओम गणेश ज्वेलर्स चे शटर उचकाटवून ज्वेलर्स मधील असणारे सुमारे वीस किलो चांदीचे दागिने त्यामध्ये झूम-झूम पैंजण,लहान पैंजण, चादिच्या मुर्त्या,करंड,ताट, ग्लास,आगरा पायल तर पाच लाख रुपयेच वीस तोळे जुने मोडी साठी आलेले सोने- चांदी चे दागिने,रोख रक्कम पाच लाख पंच्याहत्तर रुपये असा एकूण 1705000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
दरम्यान यावेळी चोरट्यानी दुकानात असणाऱ्या सीसीटीव्ही ची मोडतोड केली असून सीसीटीव्ही च्या चित्रीकरण मध्ये मागील काही दिवसाचे चित्रीकरण काढून टाकले आहे.
दरम्यान ओम ज्वेलर्स च्या शेजारी महाराष्ट्र प्रिंटींग प्रेस आहे.या प्रेस चे मालक हे त्याच इमारती मध्ये दुसऱ्या मजल्या वर राहत आहेत.या प्रेस मालकाच्या घरातील एका महिलेस खाली दुकानाजवळ कशाची तरी हालचाल व आवाज येत असल्याचे लक्षात आले असता त्यांनी खाली येऊन पाहण्यासाठी आले असता चोरट्याने तेथून पोबारा केला.
दरम्यान चोरटे हे सांगोला तालुक्यातून आले असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.त्यांनी वाकी ता.सांगोला जि सोलापूर येथून एक डमडम चोरून आणले होते.ते डमडम त्यांनी आटपाडीतील मुलाणकी येथे सोडले असून त्यांनी तेथिलच जावेद मुलाणी यांची एक इको गाडी चोरली व त्या गाडीतूनच त्यांनी आटपाडी शहरात प्रवेश केला.व याच गाडी तुन ज्वेलर्स फोडून त्यांनी पुन्हा सांगोला तालुक्यामध्ये प्रवेश करत बामणी येथे इको गाडी सोडून पळ काढला आहे.त्यामुळे चोरटे हे सांगोला तालुक्यातील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.







