काय ती झाडी, काय तो डोंगार, काय ती हॉटेल…
एकदम ओक्केमध्ये आहे समदं……!
शेतकरी सर्व सामान्यांना पावसाची चिंता ,राजकारण्यांचा मात्र सुरु आहे खेळ खुर्चीचा ….सत्तेसाठी सर्वच पक्षांची रस्सीखेच सर्वाना डोहाळे खुर्चीचेच;कोण आमचा वाली शेतकरी तथा सर्व सामान्य आला मेटकुळीला
त-हाडी प्रतिनिधी
कोरोनातुन आपण सावरतो न सावरतो तोच महाराष्ट्रातील बहुसंख्य ग्रामपंचायती नगरपंचायती , नगर पालिका महानगर पालिकांच्या निवडणुकींची रणधुमाळी उडाली आणि त्यानंतर लगीनसराई आली लगीन मागे पडली आणि जुन महीना लागल्याने शेतकरी राजी शेतीकडे पडत नाही तोच राज्याच्या सत्तेतील इतिहासात नसलेली अशी शिवसेनेच्या ४०च्या वरती आमदारांनी बंडाळी करीत राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकत असा देशासह विदेशात राजकारणी जगतात भुकंप करुन दाखविला.
गेल्या २१ जुन पासुन ही आमदार मंडळी कधी गुजरतेतील सुरतच्या पंचतारांकीत हाँटेलात तर कधी आसामातील गुहाटीतील रेडीसन ब्लु या चार तारांकीत हाँटेलमध्ये मुक्कामाला आहे येथिल चांगल्या खोलीचे एका दिवसाचे भाडे १७ हजार ४९३ रुपये असल्याचे हाँटेलचे संकेतस्थळ सांगते यासह विविध कारणावरुध गेल्या १२ दिवसापासुन सुरु झाले आहे विरोधकांच्या शाब्दीक फैरीवर फैरी , बंड केलेल्या आमदारांना ईडीचा धाक असावा,पैसा मंत्रीपद या आमीशांनी भुलुन यांनी बंड केले असावे अशा प्रकारच्या तर्क वितर्कांचे शहरासह ग्रामीण भागात पेव फुटलेले असुन यात मिडीयावाल्यानाही झोप नाही ते बंडखोर आमदार तिकडे काय करतात काय खातात कुठे झोपतात अगदी क्षणा क्षणाच कव्हरेज ही मंडळी गेल्या दहा दिवसापासुन घेत आहे मात्र ज्या मतदारांनी आपल्याला मतदान केले ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केले त्यांचा विसर या बंडाळींनी पडला का? तर असंख्य मतदारांनी विविध आशा आकांक्षा मनात ठेवु ही मंडळी आपले प्रतिनिधीत्व करतील व मतदार संघाचा विकास करतील या उद्देशाने हजारो लाखो मताधिक्क्याने ही मंडळी विधानसभेच्या पवित्र सभागृहात पाठवली त्यातच गत दोन वर्षापासुन कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे आणि आता चार पाच महीन्यापासुन नागरीक पुर्व पदावर येत असतांना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भुंकप झाला आणि एकनाथ शिंदे सारख्या विद्यमान सरकारातील शिवसेनेच्या बड्या मंत्र्याने शिवसेनेतुन बंड करुन ४० च्या वरुन आमदार गळाला लावुन पहीले सुरत व त्यानंतर गुहाटीला धुम ठोकली यामुळे आता पुढे काय होईल हे आता येणारा काळच सांगेल मात्र या मोठ्या बंडाळीमुळे राजकीय क्षेत्रांत मोठी ढवळाढवळ सुरु झाली आहे.कुणाचा बंडाळींना पाठींबा तर कुणाला यांच्या विषयी रोष राजकारणातील रोज नवनविन घडामोडी,निदर्शने आंदोलने नासधुसींच्या बातम्यामुळे आता काय होईल या तिंतेने शेतकरी तथा सर्वसामान्य जनता मेटाकुळीला आलेली आहे,आधीच कोरोनाची महामारी,जिवनावश्यक वस्तुंचे गगनाला भिडलेले दर पेट्रोल,डिझेल,गँस या इंधनाच्या दर वाढ बेरोजगारी यासह विविध समस्यांनी शेतकरी,कामगार,कष्टकऱ्यांना जगने मुष्कीलीचे झालेले असतांना ही बंडखोर मंडळी गुहाटी,सुरतमध्ये पंचतारांकीत तथा आलेशान हाँटेलमध्ये एशो आराम मौजमजा करीत आहे.इकडे जुन संपत आला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची सुरुवात झालेली नसुन तुरळक पावसावर अनेक ठिकाणी पेरणी झाली आहे मात्र ते पिक जमीनीच्या बाहेर येते की नाही याची शेतकऱ्यांना शाश्वती नाही एकतर हातात होते नव्हते पैसे त्यांनी जमिनिच्या कुशीत टाकले तसेच दिवसेंदिवस इकडे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त केलेले असतांना आपल्या समस्या दुर करण्यासाठी विधान सभेत निवडून पाठविलेले लोकप्रतिनीधी राजकारणात मश्गुल झालेले असल्याने खुर्चीच्या मोहापायी त्यांनी जनता वाऱ्यावर सोडली आहे.
शेतीसाठी लागणारी बिजवाई खत औषधे खरीदी करण्याइतपत शेतकऱ्यांजवळ पैसा नाही आणि या आमदारांचे तिकडे रहाण्या खान्याचे बिले लाखोंची निघत आहे मग यांच्याकडे हा पैसा आला कुठुन व ज्याना ईडीची भिती असेल तर मग या लोकप्रतिनिधींकडे हा पैसा आला कुठुन शेवटी जनतेतुनच ना असा संतप्त सवाल आता जनता विचारत असुन ही राजकारणाची विस्कटलेली घडी लवकरात लवकर पुर्व पदावर आणावी व राजकीय मंडळींनी हा संगित खुर्चीचा खेळ नाही हे भान ठेवावे ही खुर्ची राज्याच्या मुखीयाचा असुन या खुर्चीसाठी सुरु असलेला हा गेल्या दोन हप्प्यापासुन सुरु असलेला खुर्चीचा खेळ त्वरीत थांबवावा सत्तेत या अथवा विरोधात बसा मात्र राज्यात सुरु असलेला हा राजकीय गोधंळ थांबवा अन्यथा आम्ही पुढे येणाऱ्या निवडणुकीवर बहीष्कार टाकु कुणीच मतदान करणार नाही असा इशाराही अनेकजण बोलुन दाखवित आहे.
प्रतिक्रिया
पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबलेल्या आहे.खिशात तुटपुंजी रक्कम होती व पाहुण्यांकडून उसनवारीवर पैसे घेवुन बि भरण खत औषधी खरीदी केली आणि आता हातात पैसा नाही त्यातच महाराष्ट्रातील सरकारची खुर्ची अस्थिर झाल्याचे भासत असतांना शेतीसह जिवनावश्यक वस्तुंच्या वाढलेल्या दरांविषयी दाद कुणाकडे मागावी हा यक्ष प्रश्न पडलेला आहे
शेतकरी सर्वसामान्य रोजच्या जिवनात भेडसावत असलेल्या समस्यांनी त्रस्त आहे आणि राजकीय मंडळीचा खुर्चीच्या मोहात दंगलेली असुन आम्ही आता न्याय कुणाकडे मांघावा हा प्रश्न सतावत आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधी व राजकारणी मंडळींनी हा खुर्चीचा खेळ बंद करुन राजकीय कामकाज पुर्व पदावर आणुन शेतकरी तथा सर्व सामान्यांना दिलासा द्यावा .
रतिलाल शिंदे शेतकरी ममाने
भविष्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसेल हे अनिश्चित असल्याने आमदार मंडळींनी खुर्चीवर लावलेली एकटक







