वरुळ विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी शरद पटेल व व्हा. चेअरमन पदी दिनेश मराठे यांची बिनविरोध निवड.
तऱ्हाडी:-वरुळ येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक पार पडली यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी बी. व्हि पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली या सभेत विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन या पदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळेस चेअरमन पदासाठी शरद भिका पटेल व व्हाईस चेअरमन पदासाठी दिनेश अमृत मराठे या दोघांचा एक एक अर्ज असल्यामुळे या ठिकाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सदस्य अरविंद भगवान सिंग गिरासे. कैलास संतोष मराठे .देविदास न्हानका कोळी .
संग्रामसिंह गोरख सिंह राजपूत .धनराज दयाराम कोळी. प्रशांत पंडित मराठे. छायाबाई नगीन पटेल. विमलबाई उखडू भोई हे सदस्य उपस्थित होते निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वरुळ ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र मराठे. उपसरपंच एकनाथ बोरसे. माजी सरपंच मनीलाल पटेल .भरत गिरासे. हरी जयराम मराठे यांचे सहकार्य लाभले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी बी व्हि. पवार व सचिव सुधाकर विसपुते यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन ची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले







