• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाडी बु.येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
June 30, 2022
in महाराष्ट्र
0
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाडी बु.येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाडी बु.येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शिरपूर : मोजे वाडी ता.शिरपूर जि धुळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाडी बु. येथे दि.२९/६/२०२२ रोजी विविध शैक्षणिक उपक्रम व विषय सत्रांनी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. या शिक्षण परिषदेसाठी केंद्रांतर्गत सर्व व्यवस्थापनांचे, सर्व माध्यमांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेची सुरवात मुख्याध्यापकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करून झाली.परिषद यशस्वी होण्यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था धुळे च्या प्राचार्या डॉ.मंजुषा क्षीरसागर, शिक्षणाधिकारी(प्राथ) मा.राकेश साळुंखे, पंचायत समिती शिरपुर चे गटशिक्षणाधिकारी मा. आर .के. गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी मा. डी. पी. बुवा यांनी विशेष मार्गदर्शन केले.


केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेची सुरवात ‘शाळापूर्व तयारी’ या विषयाने झाली.या विषयाच्या माध्यमातून शैक्षणिक अखंडतेसाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक पूल सांधण्याच्या अनुषंगाने शाळापूर्व तयारी मेळावे, त्यासाठीचे यशस्वी नियोजन त्यानुसार प्रभावी अंमलबजावणी आणि त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष झालेला फायदा यावर विस्तृत विवेचन व त्याचे पीपीटीद्वारे सादरीकरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षक सुभाष राऊत यांनी केले.गेल्या २ वर्षांपासून कोरोनमुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावला आहे अशा परिस्थिती शाळा पूर्व तयारीचे महत्व आहे. त्यांनी मार्गदर्शन करत त्यावर विस्तृत व प्रभावी चर्चा घडवून आणली.


केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या दुसऱ्या सत्रात केंद्रशासनाच्या ‘निपुण भारत’ अंतर्गत निर्धारित केलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर सुचवल्याप्रमाणे त्यातील उद्दिष्टे, अपेक्षित क्षमता प्राप्ती व त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या सुकाणू समिती व सनियंत्रण समितीची कार्ये या विषयावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुवे चे उपेंद्र पाटील यांनी PPT द्वारे मार्गदर्शन केले.तिसऱ्या सत्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदर्डे चे रामेश्वर माळी यांनी धुळे जिल्ह्यातील अध्ययन सद्यस्थितीची माहिती आकडेवारी, आलेख हे पीपीटीच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडून एकंदरीत जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी करावयाच्या उपाययोजना यावर विस्तृत चर्चा केली.चौथ्या सत्रात पंचायत समिती शिरपुरच्या गटसाधन केंद्रातील साधन व्यक्ती सचिन जडीए यांनी राष्ट्रीय संपादणूक अहवाल २०२१ (NAS)यावर पीपीटीद्वारे उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.त्यांनी NAS २०२१ च्या अहवालात धुळे जिल्हयाची सद्यस्थिती सांगत संपूर्ण देशात व राज्यासोबत तुलनात्मक स्थितीबद्दल चर्चा घडवून आणली.परिषदेच्या शेवटच्या सत्रात पंचायत समिती शिरपुरच्या गटसाधन केंद्रातील दिव्यांगांसाठीचे साधन व्यक्ती विशेष शिक्षक ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांनी 21 दिव्यांगांच्या प्रकारावर PPT द्वारे मार्गदर्शन केले. तसेच विविध योजना, सोयी, सवलती याबाबत माहिती दिली.


वरील विविध विषय सत्रे चांगल्याप्रकारे होण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक विनीत भदाणे, रामेश्वर माळी यांनी PPT सादरीकरणात अनमोल सहकार्य केले. वाडी केंद्राचे केंद्रप्रमुख सतीशचंद्र आखडमल यांनी केंद्रातील शैक्षणिक गरजांवर चर्चा घडवून आणली. गुणवत्ता, उपस्थिती, पट वाढविण्यासाठी प्रयत्न, शाळेतील अभिलेख अद्ययावत ठेवावे याबाबत सूचना दिल्या. तसेच पुढील नियोजन केले.


सदर केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेतील विषयवार चर्चेत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन चर्चा केली. आपले मत, विचार मनोगतातून सर्वांसमोर मांडले.

Views: 257
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
राज्य शासनाकडून निधी नुकताच उपलब्ध झालेला आहे-अध्यक्षा -ज्योती आदाटे .

राज्य शासनाकडून निधी नुकताच उपलब्ध झालेला आहे-अध्यक्षा -ज्योती आदाटे .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)