मुलीच्या मृत्यूचा मानसिक धक्का सहन न झाल्याने विरहातून राजेवाडी मध्ये पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
आटपाडी प्रतिनिधी
राजेवाडी ता. आटपाडी येथील करण हेगडे व शीतल हेगडे यांच्या दोन वर्षाच्या मुलीचा गेल्या चार दिवसापूर्वी गळ्यामध्ये खाऊ पदार्थ अडकल्याने मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यू वेळी झालेली तिची तडफड पाहून पती-पत्नी अत्यंत दुखी होते. ते दुःख सहन न झाल्याने नैराश्यातुन गुरुवार दिनांक 30 जून 2022 रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राजेवाडी पासून काही अंतरावर असणाऱ्या कानबुनाथ मंदिर च्या समोर करण हेगडे वय 28 वर्ष व त्याची पत्नी शीतल हेगडे वय 22 वर्ष या दोघांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सदर घटनेची माहिती राजेवाडी चे पोलीस पाटील यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. मयताच्या जवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठी मध्ये मुलीच्या विरहामुळे मुळे व्यतीत होऊन आम्ही आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. आमच्या मृत्यूस आम्ही स्वतः जबाबदार असल्याचं त्यात म्हटलं आहे. पोलीस या घटने संदर्भात अधिक तपास करीत आहेत.







