शिंदे सरकारचा नवा धक्का–विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची नवी यादी पाठवणार.
- पत्रकार क्षेत्रातुन विधानपरिषद सदस्यपदी विलासराव कोळेकर सर यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याची मागणी नवनिर्वाचित मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्यपाल महोदय यांच्याकडे करणार-आण्णासाहेब कोळी
पत्रकार Times : मुंबई :
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांनी शुक्रवारी राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या १२ सदस्यांची नवी यादी पाठवण्याचे संकेत दिल्याची सूत्रांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दीड वर्षांपूर्वीच या जागांसाठी आपल्या १२ सदस्यांची नावे पाठवली होती. त्यानंतर तत्कालीन सरकार मधील नेत्यांनी अनेकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे ही नावे जाहीर करण्याची विनंती केली. पण, राज्यपाल कोश्यारी यांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही.
आता नव्या सरकारच्या नव्या यादीवर ते कोणता निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने पत्रकार क्षेत्रातून विधान परिषद सदस्यत्व देण्याची मागणी वारंवार होत आहे त्या धर्तीवर पत्रकार क्षेत्रातुन प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर सर यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याची मागणी आण्णासाहेब कोळी हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्यपाल महोदय यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन करणार आहेत.यांसोबतच पंकजाताई मुंडे, हर्षवर्धन पाटील, सदाभाऊ खोत यांच्यासह अनेकांची संभाव्य नावे असण्याची शक्यता आहे.







