तऱ्हाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे चेअरमन पदी प्राध्यापक प्रशांत पाटील व व्हाईस चेअरमन पदी प्राध्यापक उदयकुमार भलकार यांची बिनविरोध निवड
तऱ्हाडी:- येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक पार पडली त्यात चेअरमन व्हा .चेअरमन पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी भूपेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विकास सोसायटीचच्या कार्यालयात निवडणूक पार पडली या निवडणुकीत चेअरमन पदासाठी .प्रा .प्रशांत दंगल पाटील व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रा. उदयकुमार भलकार यांचा एक एक अर्ज असल्यामुळे चेअरमन पदी प्रशांत दंगल पाटील व व्हा.चेअरमन पदासाठी प्रा. उदय कुमार यांची बिनविरोध निवड झाली असे निवडणूक निर्णय अधिकारी भूपेंद्र पाटील .सहाय्यक पी .के.पाटील गट सचिव सुधाकर विसपुते यांनी जाहीर केले यावेळी स़ंचालक शशिकांत नामदेव कदम. ज्ञानेश्वर बंन्सिलाल पाटील .
शिवाजी निंबा बोरसे. प्रकाश वगर भामरे. दिलीप गंभीर अहिरे. सुनील विनायक भामरे. सुभाष खुशाल पाटील.संजय शांतीलाल भामरे. दादाभाऊ भिल. जयश्री रावसाहेब चव्हाण. बेबाबाई नथा खोंडे उपस्थित होते हि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच सुदाम भलकार.माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ओंकार दशरथ पाटील व ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार. पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन अनिल करंके यांचे सहकार्य लाभले व कार्यक्रम आयोजन रावसाहेब चव्हाण आभार माजी उपसरपंच अशोक सोनवणे यांनी मानले व शिपाई युवराज भामरे यांचे सहकार्य लाभले







