भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी, जिल्हा जळगाव महिला आघाडीतर्फे केन्द्रातील बीजेपी सरकारचा महागाई विरोधात आंदोलन !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
आज जळगाव येथे भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी जिल्हा जळगाव महिला आघाडीतर्फे खाण्याचे तेल, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ इंधनी वर आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळेस जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. केंद्रात असलेल्या बीजेपी सरकारच्या विरोधात हे आंदोलन होते. सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या अशा जीवनावश्यक वस्तूंचे दररोजचे वाढणारे भाव यामुळे जनता त्रस्त झाली आहे. यावेळेस सुलोचना ताई वाघ, कांताताई बोरा, मनीषा पाचपांडे, मानसी पवार, कल्पना पाटील व इतर सर्व कार्यकर्त्या आणि पदाधिकारी उपस्थित होत्या. तसेच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतल्याबद्दल, आज सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी
डॉ. ऐश्वर्री यश राठोड, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी, तालुका. जामनेर, जिल्हा. जळगाव यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले.