आजोळ परीवारातील वृद्ध निराधारांना गोड जेवन देत अशोक शिंदे यांचा वाढदिवस साजरा
प्रतिनिधी ! शिरुर
शिरुर येथिल पञकार अशोक शिंदे हे दरवर्षी सामाजिक जाणीव ठेवुन एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस करतात.यावर्षी ४ जुलै रोजी वाढदिवस आसल्याने त्यांनी तालुक्यातील राक्षसभुवन येथिल आजोळ परीवार येथे वृद्ध,निराधार ,दिंव्याग,मतिमंद आसणार्या व्यक्तींना एक दिवसाचे अन्नदान करत वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा केला.
हे कर्ण तांबे यांनी गेल्या तिन वर्षापासुन राक्षसभुवन येथे आजोळ प्रकल्प चालु केला आहे.२०११ पासुन समाजसेवेचे वृत्त घेतलेले कर्ण तांबे हे मनोरुग्नांना आंघोळ घालने त्यांचे केस कापने,नखे काढने असे काम ते करत आहेत.या आजोळ परीवारामध्ये कर्ण तांबे यांना पत्नी कोमल तांबे ह्या त्यांना मदत करत आहेत.दोघेही कसलेही मनाचा मोठेपणा न दाखवत नित्यनेमाने हे दापंत्य या लोकांच्या सेवेसाठी तत्तपर आसते.अशोक शिंदे यांनीही आपला काहीतरी हातभार लागावा या हेतुने वाढदिवसाचा अवाढव्य खर्च टाळत आजोळ परीवारातील व्यक्तींना एक दिवसाचे गोड जेवन दिले
.तसेच आजोळ या परीवारामध्ये वृक्षारोपण केले.गेल्यावेळेस अशोक शिंदे यांनी पोलीस ठाणे शिरुर येथे केशर आंब्याचे झाड लावले होते तर सर्पराज्ञी प्रकल्पावर वृक्षारोपण करत येथिल प्रांण्याना फळे देण्यात आली.
गेल्या काही वर्षापासुन शिंदे यांचा हा वाढदिवस करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. पञकार अशोक शिंदे यांच्या या आगळ्या-वेगळ्या वाढदिवसाचे सर्व स्तरातुन अभिनदंन होत आसुन इत्तरांनीही वाढदिवसाचा अवाढव्य खर्च टाळत येथील वृद्ध,निराधार अंपग व्यक्तींना प्रेमाने दोन घास भरावे असे आजोळ परीवाराचे संचालक कर्ण तांबे यांनी सांगितले.
यावेळी पञकार भारत पानसंबळ, सतिष मुरकुटे,गौतम औसरमल,बाळकृष्ण मंगरुळकर,प्रमोद निकम,मनोज परदाशी,बाळासाहेब दुधाळ,प्रथमेश गुंड,यांच्यासह वृक्ष प्रेमी उपस्थित होते.







