हुंडा पद्धत समाजातील लोभिष्ट माणसाच्या मनोवृत्तीचा आरसा –
हुंडा पध्दत ही एक सामाजिक समस्या
त-हाडी -(ललिता खोंडे)
हा हुंडा एक सामाजिक समस्या आहे. हुंडा पद्धती म्हणजे समाजातील लोभिष्ट स्वभावाच्या माणसाच्या वाईट मनोवृत्तीचा आरसा आहे. असे प्रतिपादन — सोनल खोंडे महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ धुळे जिल्हा संघटक यांनी केले आहे. या हुंडाबळी मुळे स्त्रियांवर नेहमीच अत्याचार होताना दिसत आहे.
हुंडा प्रथेबद्दल समाजाची असणारी मानसिकता व हुंडाबळी कायद्यात असलेल्या कमतरता याविषयी सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. भारतात आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणात आहे. एका बाजूला गडगंज संपत्ती असणारे भांडवलदार आहेत; तर दुसर्या बाजूला अन्नाची भ्रांत असणारे लक्षावधी गरीब आहेत. एका बाजूला उंच उंच आलिशान इमारती आहेत, तर दुसर्या बाजूला हीनदीन झोपडपट्ट्या आहेत. अशा या दोन परस्परविरोधी समाजांत एका बाबतीत मात्र साम्य आहे आणि ती बाब म्हणजे ‘हुंडाबळी’. श्रीमंतांकडे ज्याप्रमाणे हुंड्यासाठी बळी पडतात, त्याप्रमाणे गरिबांच्यातही हुंड्यामुळे खून केले जातात. हुंड्याचे हे जहर आज पिढ्यान्पिढ्या आपल्या समाजात भिनले आहे. त्यामुळे मुलगी झाली की आईवडिलांच्या काळजाचा ठोका चुकतो. मुलीला जन्म देणार्या स्त्रीकडे उपेक्षेने पाहिले जाते. कित्येक गरीब घरांतून तर या हुंड्याच्या रूढीपायी कित्येक मुली अविवाहित राहतात. असे महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ धुळे जिल्हा संघटक सोनल खोंडे यांनी सांगितले आहे.
समाजातील लोकांची हुंड्याची हाव सुटण्याची आवश्यकता!
हुंडा ही लग्नाच्या वेळी मुलाकडून किंवा मुलीकडून विरुद्ध बाजूच्या कुटुंबाला देण्यात येणारी भेट आहे. ही भेट पैसे, मालमत्ता किंवा वस्तू सोने स्वरूपात घेतली जाते. भारतात हुंड देने किंवा घेणे दोन्ही बेकायदेशीर आहे. हुंडाचा अर्थ आहे जी सम्पत्ति, लग्नाच्या वेळी वधूच्या कुटुंबा तर्फे वरला दिली जाते. त्याला हुंडा असे म्हणतात.यासाठी सामाजातील लोकांची हुंड्याची हाव सुटण्याची आवश्यकता आहे. असे सोनल खोंडे महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ धुळे जिल्हा संघटक त्यांनी सांगितले आहे.
फोटो – सोनल खोंडे महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ धुळे जिल्हा संघटक







