आटपाडी तालुक्यातील मेंढपाळांचे चाऱ्यासाठी स्थलांतर
पाऊस लांबल्याने चारा सुकला, चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला
आटपाडी तालुक्यांमध्ये पावसाने धडी मारल्याने चाऱ्याची टंचाई भासू लागली आहे .पाऊस नसल्याने पेरण्याही लांबणीवर गेल्या आहेत. त्याचबरोबर चारा टंचाई भासू लागली आहे. येथील ग्रामस्थांना उपजीविका भागवण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नसल्याने मेंढपाळ हा व्यवसाय करतात. परंतु यावर्षी पाऊस लांबल्याने चारा सुकून गेला आहे, वाळून गेला आहे ,त्यामुळे चाऱ्यासाठी मेंढपाळांना स्थलांतर करावे लागत आहे.



आटपाडी तालुका म्हटलं की दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याला वरदान ठरणारी टेंभू योजना अजूनही पूर्ण क्षमतेने पूर्ण झाली नाही. त्यामुळे अनेक भागांमध्ये टेंभूचे पाणी आले नाही. अशा भागांमध्ये मेंढपाळांना चाऱ्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे.
दरवर्षीच मेंढपाळ दीपावली नंतर कराड भागामध्ये कृष्णा नदीच्या भागांमध्ये चाऱ्यासाठी स्थलांतर करतो. तर जून जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर तो आप -आपल्या भागामध्ये येतो.
परंतु यावर्षी पाऊस लांबल्याने अनेक मेंढपाळांनी चंद्रभागा नदीकडे म्हणजेच पंढरपूर भागांमध्ये स्थलांतर केले आहे. अनेक मेंढराचे कळप पंढरपूरच्या दिशेने जाताना दिसत आहेत.









अनेक नागरिकांना उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्यामुळे मेंढपाळ व्यवसाय करीत आहेत. मेंढपाळांना चारा मिळण्यासाठी सरासरी 9 ते 10 महिने मेंढरे घेऊन मेंढपाळ बाहेरच असतात. त्यामुळे मुलांच्याही शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होतो .मुले शिकवण्यासाठी ठेवायची कुठे ?कोणाकडे ठेवायची ?ते शिकतात का नाही? याच्यावर मेंढपाळांचं लक्ष नसते .त्यामुळे अनेक मुले अजू अजूनही अशी अशिक्षित राहिलेले आहेत.
दरवर्षीच मेंढपाळांना चाऱ्यासाठी स्थलांतर करावं लागत आहे. हे स्थलांतर थांबणार कधी ? हा गंभीर प्रश्न आहे. जर टेंभूचे पाणी तालुक्यातील प्रत्येक गावागावांमध्ये आले तर चाऱ्याचा प्रश्न मिटू शकतो. परंतु टेंभूचे काम अगदी संत गतीने सुरू आहे. त्यामुळे मेंढपाळांना स्थलांतर करावे लागत आहे.
आतापर्यंत तालुक्यातून अनेक मेंढराचे खंडवे, पंढरपूरकडे जाताना दिसत आहेत .खरंतर आता पावसाळ्याचे दिवस आले ,चारा होणार या अशाने कराड भागातून मेंढपाळ आपापल्या गावाकडे आलेले आहेत. परंतु पाऊस लांबल्याने रानातील गवत सुकून गेले आहे. मग मेंढपाळाची पोट भरणार कशी ? हा गंभीर प्रश्न असल्यामुळे पुन्हा मेंढपाळांना स्थलांतर करावं लागत आहे. या मेंढपाळांचं स्थलांतर थांबणार कधी ? टेंभू योजनेचे पाणी गावोगावी येणार कधी ? हा गंभीर प्रश्न आहे.
चाऱ्यासाठी मेंढपाळांचा आठ ते नऊ महिने स्थलांतर होत आहे त्यामुळे त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे यापूर्वी अनेक मेंढपाळाची मुलं अशिक्षित राहिलेली आहेत भविष्यामध्ये मेंढपाळांची मुले अशिक्षित राहून नयेत मेंढपाळांची मुले अशिक्षित राहू नयेत यासाठी टेंभू योजनेचे पाणी गावोगावी आले तर चाऱ्याचा प्रश्न सुटू शकतो, व मुलांचे शिक्षण पूर्ण होऊ शकते .यासाठी राज्यकर्त्यांनी लक्ष देऊन टेंभूचे काम पूर्ण होऊन गावोगावी पाणी येईल, अशी उपाययोजना करावी अशी मागणी मेंढपाळ वर्गातून होत आहे.







