तऱ्हाडी येथील ग्राम विकास अधिकारी सतत गैरहजर असल्याने ग्रामस्थांनी सरपंचांना निवेदन दिले
तऱ्हाडी:-ग्रुप ग्रामपंचायत तऱ्हाडी येथील ग्राम विकास अधिकारी अविनाश बैसाणे हे सतत गैरहजर असल्याने गेल्यास पंधरा दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयात येत नसल्याने तऱ्हाडी. अभाणपूर व मामाने येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे
ग्रामविकास अधिकारी दररोज कार्यालयात उपस्थित राहावे यासाठी तऱ्हाडी येथील महिला व नागरिकांनी लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनील धनगर यांना निवेदन दिले . तऱ्हाडी, ममाने ,अभानपूर मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे अभाणपूर व ममाने हे शंभर टक्के आदिवासी गावे आहेत तरी आदिवासी लोकांना कामाच्या अडचणी येत आहेत
तिन्ही गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त असल्याने लोकांना ग्रामपंचायत कार्यालयात जन्म दाखला, मृत्यू दाखला, व विवाह नोंदणी गावातील लाईट व्यवस्था. पाणी व्यवस्था पावसाळा असल्यामुळे रस्त्यांची दुरावस्था असे अनेक समस्या आहेत या समस्या दूर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांची दररोज उपस्थिती आवश्यक आहे
परंतु कार्यालयात ते हजर राहत नाही तरी वरील कामांसाठी. ममाने तऱ्हाडी व अभाणपूर येथील नागरिकांची काम होत नाही तरी ग्रामविकास अधिकारी यांनी दररोज कार्यात हजर राहण्यासाठी ममाने व तऱ्हाडी व अभाणपूर येथील ग्रामस्थांनी सरपंच जयश्री सुनील धनगर यांना निवेदन देऊन पुढील कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा केलेली आहे







