आदर्श विदयालय,कळमसरे येथे निवडणुक प्रात्यक्षिक
त-हाडी प्रतिनिधी- दि.९-उद्यान पंडित बापूसाहेब ग.द.माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्थेचे आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे ता. शिरपूर जि. धुळे येथे आज दिनांक ०९/०७/२०२२ रोजी शालेय मंत्रिमंडळाचा पंतप्रधान पदाची निवडणूक आयोगाच्या आचार संहिते प्रमाणे व गुप्त मतदान पदधतीने घेण्यात आली. व निवडणूक कशी घेतली जाते याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
या निवडणूक साठी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी
कु.निकिता साहेबराव थोरात
व
कु.दिपाली दिपाली गोकुळ पाटील
या दोन विद्यार्थ्यांनी नामांकन दाखल केले होते.
शालेय मंत्रिमंडळातील एकूण 47 सदस्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग सहभाग घेतला. गुप्त मतदान पद्धतीने मतदान प्रक्रिया राबविण्यात आली ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सर्व निवडणुका घेत असतात तशा पद्धतीने निवडणुकीचे कामकाज शनिवारी सकाळी ७ ते ९ या वेळात घेण्यात आली. विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना समक्ष मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग नोंदवून गुप्त मतदान पद्धतीने मतदान करून आपल्या मंत्रिमंडळाचा पंतप्रधानाची निवड केली. मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली आणि विजयी उमेदवार घोषित करण्यात आला या मतदान प्रक्रियेमध्ये कु.दिपाली गोकुळ पाटील हिला एकूण 33 मते मिळाली तर कु.निकिता साहेबराव थोरात, हिला एकूण 14 मते मिळाली. बहुमताचा आकडा विचारात घेता दिपाली गोकुळ पाटील हिला विजयी घोषित करण्यात आले. विजयी उमेदवाराचा विरोधी उमेदवाराच्या हस्ते उमेदवाराचा सत्कार करण्यात आला.
या निवडणुकीचे कामकाज मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून, मुख्याध्यापक .
श्री.वाय. व्ही.पाटील, उपनिवडणूक आयुक्त म्हणून, श्री.एस.एच .जाधव सर , आर.जे.सोनवणे सर ,ए.डी.महाजन सर, यांनी कामकाज पाहिले, तर झोनल ऑफिसर म्हणून *श्री.एन. एस. साळुंखे, श्रीमती. ज्योती निकवाडे ,सौ. व्ही. जी. सोनवणे, यांनी कामकाज पाहिले मतदान अधिकारी म्हणून क्रमांक एक म्हणुन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु.मनीषा कोळी, हिने तर मतदानाधिकारी दोन म्हणुन,आठवीतील विद्यार्थिनी कु.जागृती कलाल यांनी काम पाहिले,मतमोजणी साठी अधिकारी म्हणून, इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु.स्वाती बुवा व श्रद्धा मराठे यांनी कामकाज पाहिले निवडणूक निपक्षपतीपाने पणे व स्वच्छंद वातावरणात संपन्न झाली निवडणुकीनंतर विजयी उमेदवाराचा सर्व वर्ग प्रतिनिधींनी व विद्यालयाच्या मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून सत्कार केला व मतदान प्रक्रिया कशी पार पाडली जाते याचा सुंदर प्रात्यक्षिकाचा अनुभव विद्यार्थी वर्गांना दाखवण्यात आला . यासाठी मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मतदान प्रक्रीयाची माहीती व आभार क्रीडा शिक्षक श्री.ए.डी.महाजन,सर यांनी मानले







