गोडसेवस्ती शाळेत बालदिंडी उत्साहात साजरी…..
गोडसेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये केंद्र कोळेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या शाळेत आषाढी वारी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
पालखी सोहळ्याचे कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत सदस्या सौ. माया औदुंबर काळेल व माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष श्री औदुंबर बबन काळेल यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची आरती करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा भक्ती भाव या गुणांची संकल्पना मुलांमध्ये रुजावी. यासाठी विठ्ठलाच्या पालखीची दिंडी, वारीतील फुगडी तसेच रिंगण अशा कार्यक्रमाचे आयोजन करून पालखी सोहळा साजरा केला.
सदर पालखी सोहळ्यासाठी शिंगोर्णी ग्रामपंचायत सदस्या सौ.माया औदुंबर काळेल. तसेच माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष श्री औदुंबर बबन काळेल.व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री कलाप्पा मुंजे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सचिन मुंजे, सदस्य श्री बाजीराव शिंदे,अर्जुन पिसे, दऱ्याप्पा गोडसे, चेतन मुंजे,सौ.रुक्मिणी मुंजे, मोहन काळेल व पालक, ग्रामस्थ व शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव शिवाजी शिंदे व उपशिक्षिका श्रीमती वर्षा उमाकांत सोनार मॅडम उपस्थित होते. या सर्वांचे कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल शाळेच्या वतीने व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.







