• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सरण थकले मरण पाहुणी.. मरणानंतरही प्रेतालाही भोगाव्या लागतात नरक यातना..

माणगंगा by माणगंगा
July 9, 2022
in महाराष्ट्र
0
सरण  थकले मरण पाहुणी.. मरणानंतरही प्रेतालाही भोगाव्या लागतात नरक यातना..

सरण ही थकले मरण पाहुणी..
मरणानंतरही प्रेतालाही भोगाव्या लागतात नरक यातना..

सुरगाणा (बातमीदार हिरामण चौधरी.पळसन)

सरण ही थकले मरण पाहुणी..
मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना.. या काही एखाद्या कवितेतील भावार्थ स्पष्ट करणा-या ओळी नसून प्रत्यक्ष सुरगाणा तालुक्यातील वाघधोंड ग्रामपंचायत मधील
साबरदरा येथे स्मशानभूमी अभावी भरपावसात एका मृतदेहाची झालेली अवहेलनेची वस्तुस्थिती आहे.


साबरदरा येथे ८ जुलै रोजी
एका वयोवृद्ध महिलेचे आक्समिक निधन झाले. त्याचवेळी सकाळ पासूनच संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी अद्यापही स्मशानभूमी शेडच नसल्याने कुटुंबाने शेतातच अंत्यविधी उरकण्याचा निर्णय घेतला. साबरदरा येथील स्मशान भूमी कहांडोळचोंड शेजारी कासूटन्याचा कुंड येथे असून तेथे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्याने विशेषतः पावसाळ्यात खुपच हाल अपेष्टा सहन करावा लागत आहेत. हे ठिकाण नदीच्या काठावर असल्याने नदीला पूर असल्यास खूपच समस्यांना सामोरे जावे लागते.
ग्रामपंचायत वाघधोंड असून बंधारपाडा व वाघधोंड येथे स्मशान भूमी शेड आहे मात्र साबरदरा पासून अंतर तीन किलोमीटर दूर आहे त्यामुळे तेथे प्रेत भर पावसात घेऊन जाता येत नाही.

अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे
चितेला अग्नी द्यायचा कशा असा प्रश्न नागरिकांना पडला. कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात.पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात.


तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजून ही स्मशानभूमी करीता प्रतिक्षा करावी लागतेय हे न उलगडणारे कोडे आहे. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमी पर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात. शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. वाघधोंड ग्रामपंचायतीत केवळ दोनच गावे समाविष्ट असून साबरदरा येथे अद्याप स्मशानभूमी शेड नाही.

१) प्रतिक्रिया-” वाघधोंड ग्रामपंचायत मध्ये साबरदरा व बंधारपाडा हि गावे आहेत. पैकी साबरदरा येथे
स्मशानभूमी शेड उभारलेले नाही.त्यामुळे विशेषत पावसाळ्यात आक्समिक निधन झाले तर सरण रचलायला खुप अडचणी निर्माण होतात. शेड नसल्याने आम्हांला नाईलाजाने शेतातच अंत्यविधी उरकण्याचा निर्णय घेतला.
अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरी जनसुविधा अथवा ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशानभूमी शेड उभारून दिल्या स सोयीचे होईल.”
मयताचा नातू- वसंत भोये.

२) प्रतिक्रिया-” स्मशानभूमी शेड जनसुविधा योजनेतून
तसेच रोजगार हमी योजनेतून रस्ता मंजूर करण्यात आला आहे. जागा खाजगी मालकाची असल्याने कागद पत्राची पुर्तता करून काम सुरु करण्यात येईल.


स्मशानभूमी शेड उभारून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.”
विलास अहिरराव
ग्रामसेवक वाघधोंड.

फोटो- सुरगाणा तालुक्यातील साबरदरा येथे स्मशानभूमी शेड अभावी सरणावर ताडपत्री टाकुनी चिता रचण्याची ग्रामस्थांवर आलेली वेळ.

Views: 466
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पोदार जंबो किड्स मायणी मध्ये चिमुकल्यांनी केली आषाढी वारी

पोदार जंबो किड्स मायणी मध्ये चिमुकल्यांनी केली आषाढी वारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)